50 टास्क, आईला शेवटचं बाय अन् 3 सख्ख्या बहिणींचा अंत, वडिलांनी सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
गाझियाबादच्या भारत सिटीमध्ये तीन अल्पवयीन बहिणींनी ऑनलाइन गेमच्या प्रभावाखाली ९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, पोलिस तपास सुरू आहे.
advertisement
1/8

गाझियाबादच्या भारत सिटी'मध्ये तीन अल्पवयीन सख्या बहिणींनी ९ व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. मात्र, आता या प्रकरणात एक अत्यंत भयावह माहिती समोर येत आहे.
advertisement
2/8
या मुलींनी आत्महत्येचा हा टोकाचा निर्णय एका ऑनलाइन टास्क-बेस्ड गेमच्या प्रभावाखाली घेतला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, ज्याचा शेवटचा टप्पा हा आयुष्य संपवणं हाच होता. मुलींच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघींना गेल्या अडीच वर्षांपासून एका विशिष्ट ऑनलाइन गेमचे व्यसन जडले होते.
advertisement
3/8
मुली अनेकदा वडिलांना म्हणायच्या, "पप्पा, आम्ही कोरियन सोडू शकत नाही, तेच आमचे जीवन आहे. तुम्ही आम्हाला त्यापासून वेगळे केले तर आम्ही प्राण देऊ." धक्कादायक बाब म्हणजे, या तिघींनीही गेल्या दोन वर्षांपासून शाळेत जाणे बंद केले होते आणि त्या स्वतःला खोलीत कोंडून घेत तासनतास मोबाईलमध्ये मग्न असायच्या.
advertisement
4/8
वडिलांनी असा दावा केला आहे की, फॉरेन्सिक टीमने मोबाईल तपासात त्यांना काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. या गेममध्ये एक इन्स्ट्रक्टर असायचा आणि बाकीच्यांना त्याच्या आज्ञा पाळाव्या लागायच्या. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, त्या रात्री त्यांच्या मोबाईलवर आलेला शेवटचा टास्क हा आयुष्य संपवण्याचा होता.
advertisement
5/8
बुधवारी मध्यरात्री १.४५ च्या सुमारास आई-वडील झोपेत असताना पाणी पिण्याच्या बहाण्याने या तिघी बाहेर आल्या. त्यांच्या हातात मोबाईल होते. त्यांनी आपले मोबाईल पाठीमागे फेकून दिले आणि थेट ९ व्या मजल्यावरून उडी घेतली.
advertisement
6/8
हे सगळं करण्याआधी लहान बहिणीनं आईला शेवटचं बाय केलं होतं असंही वडिलांनी सांगितलं. पोलिसांना या बहिणींच्या खोलीचं दार तोडावं लागलं. स्टूलच्या मदतीनं या तिघींही आयुष्य संपवल्याचं तपासात समोर आलं.
advertisement
7/8
पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही ताब्यात घेतली. ज्यामध्ये एका बहिणीने लिहिले आहे की, "पप्पा, मला माफ करा. डायरीत जे काही लिहिलं आहे ते खरं आहे, ते वाचा." एकाच वेळी १५, १४ आणि ११ वर्षांच्या तीन मुलींचा असा करुण अंत झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
advertisement
8/8
"तुमच्या मुलांच्या मोबाईलमधील ॲप्स आणि गेमिंगच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका," असं आवाहन वडिलांनी केलं आहे. एसीपी अतुल कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आता त्या 'विशिष्ट गेम'चा आणि मुलींच्या डायरीचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
50 टास्क, आईला शेवटचं बाय अन् 3 सख्ख्या बहिणींचा अंत, वडिलांनी सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग