Shahu Maharaj Jayanti 2024: छत्रपती शाहू महाराजांचं मूळ नाव काय होतं? त्यांना शाहू नाव कोणी दिलं?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shahu Maharaj Jayanti 2024: छत्रपती शाहू महाराजांची आज (26 जून 2024) जयंती साजरी होत आहे. राजर्षी शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली.
advertisement
1/6

1894 मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते 1922 मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.
advertisement
2/6
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
advertisement
3/6
महाराजांना "राजर्षी" ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्याला "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.
advertisement
4/6
शाहू महाराजांचा जन्म 26 जून इ.स. 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत होते, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व 'शाहू' हे नाव ठेवले.
advertisement
5/6
सन 1889 ते 1893 या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच 01 एप्रिल 1891 रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय 17 वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाईंचे वय 12 वर्षांहून कमी होते.
advertisement
6/6
02 एप्रिल 1894 रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. 1922 सालापर्यंत म्हणजे 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे 06 मे 1922 रोजी त्यांचे निधन झाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Shahu Maharaj Jayanti 2024: छत्रपती शाहू महाराजांचं मूळ नाव काय होतं? त्यांना शाहू नाव कोणी दिलं?