Delta Airlines Plane Crash: टोरंटो एअरपोर्टवर मोठी दुर्घटना, 80 प्रवाशांनी खचाखच भरलेलं प्लेन क्रॅश, कोलांट्या उड्या खाऊन... पाहा भयावह Photos
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Delta Airlines Plane Crash: कॅनडामधील पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. डेल्टा एअरलाइन्सचे विमान लँडिंग दरम्यान कोसळल्याने मोठी अपघात घडला.
advertisement
1/6

कॅनडामधील पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. एक विमानाचं लॅडिंग होत असताना दुर्घटना घडली. त्यानंतर विमानाला आग लागल्याने एकच खळबळ उडाली.
advertisement
2/6
विमान लँडिंगसाठी खाली येताच बर्फाळ जमिनीमुळे विमानाला व्यवस्थित लँडिंग करता आली नाही अन् विमानाने कोलांटी उडी खालली. त्यानंतर विमानाला आग लागली.
advertisement
3/6
कॅनडामधील या अपघातात 19 जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. घटनेनंतर तातडीने आपत्कालीन बचाव पथक तयार करण्यात आलं होतं.
advertisement
4/6
मिनियापोलिसहून आलेल्या डेल्टा फ्लाइटमध्ये ही घटना घडली. यामध्ये 76 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स जखमी झाले आहेत. अपघातानंतर विमानाला आग देखील लागली.
advertisement
5/6
मिनियापोलिसहून आलेल्या या विमानातील सर्व प्रवाशांना आणि क्रू सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय. पण काही लोकांना गंभीर दुखापत झाली आहे.
advertisement
6/6
दरम्यान, विमान का उलटलं आणि आग कशामुळं लागली यासह अपघाताची कारण अद्याप तपासली जात आहेत, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
Delta Airlines Plane Crash: टोरंटो एअरपोर्टवर मोठी दुर्घटना, 80 प्रवाशांनी खचाखच भरलेलं प्लेन क्रॅश, कोलांट्या उड्या खाऊन... पाहा भयावह Photos