Spain Ganeshotsav : स्पेनमध्ये 'गणपती बाप्पा मोरया...', गणरायाच्या आराधनेतून देशाबाहेरील लोकांनी जपली आपलेपणाची भावना
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Spain In Celebrate Ganeshotsav: मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, नाशिकसह अनेक प्रमुख शहरांमध्ये गणरायाचं आगमन झालं असताना राज्यासह देशासह आता परदेशातही लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे. गणरायाचं आगमन फक्त भारतातच दणक्यात झालं नाही तर, भारताबाहेरही दणक्यात आगमन झालं आहे. जन्मभूमी सोडून परदेशात राहणं हे केवळ जीवनाची गरज असते, पण आपल्या संस्कृतीशी असलेलं नातं कधीच तुटत नाही. याच भावनेला उजाळा देत स्पेनमधल्या बार्सिलोना येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
advertisement
1/5

सध्या महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. लाडक्या गणरायाची भक्त मनोभावे पूजा करत त्याची सेवा करीत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, नाशिकसह अनेक प्रमुख शहरांमध्ये गणरायाचं आगमन झालं असताना राज्यासह देशासह आता परदेशातही लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे. गणरायाचं आगमन फक्त भारतातच दणक्यात झालं नाही तर, भारताबाहेरही दणक्यात आगमन झालं आहे.
advertisement
2/5
अशी अनेक मंडळी आहेत जी शिक्षणासाठी किंवा नोकरी धंद्यासाठी भारताबाहेर आहेत. पण असं असलं तरी देखील त्यांना आपल्या मातीची ओढ कायमच राहते. भारतीय सण, उत्सव, संस्कृती, जेवण, परंपरा या नेहमीच त्यांना हव्याहव्याशा वाटतात. जन्मभूमी सोडून परदेशात राहणं हे केवळ जीवनाची गरज असते, पण आपल्या संस्कृतीशी असलेलं नातं कधीच तुटत नाही. याच भावनेला उजाळा देत बार्सिलोना येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
advertisement
3/5
काही मंडळींनी एकत्र येऊन गणेशोत्सवासाठी खास मंडळ स्थापन केलं आहे. देशाबाहेर असलेले मराठी आणि भारतीय लोक येथे एकत्र येतात, गणपती बाप्पाची स्थापना करतात आणि त्याच्यासमोर आरती, भजनं, सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करतात.
advertisement
4/5
बार्सिलोना सारख्या परदेशी शहरात जेव्हा ढोल-ताशांचा नाद घुमतो, जेव्हा "गणपती बाप्पा मोरया!" चा जयघोष होतो, तेव्हा प्रत्येकाचं मन क्षणभर महाराष्ट्रात पोहोचतं. ही फक्त पूजा नसते, ही आपल्या मातीशी असलेल्या नात्याची सजीव साक्ष असते.
advertisement
5/5
बार्सिलोना शहरात असलेल्या मराठी लोकांनी खास मराठमोळा पेहराव करून गणपती बाप्पाची पूजा केली. स्पेनमध्ये मराठी लोकांनीच नाही तर तिथल्या स्थानिक लोकांनीही मराठमोळी संस्कृती जोपासत गणेशोत्सव साजरा केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
Spain Ganeshotsav : स्पेनमध्ये 'गणपती बाप्पा मोरया...', गणरायाच्या आराधनेतून देशाबाहेरील लोकांनी जपली आपलेपणाची भावना