Shreya Bugade : ‘लाफ्टर क्विन’ श्रेया बुगडेचा सोज्वळ साज; पाहा PHOTO
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Shreya Bugde Photos : प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री श्रेया बुगडे हिने आपल्या निखळ सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कायमच कॉमेडीमुळे चर्चेत राहणाऱ्या श्रेयाने गणेश विसर्जनानिमित्त काही खास फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
advertisement
1/6

'चला हवा येऊ द्या' शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचणाऱ्या श्रेयाने इन्स्टाग्रामवर काही खास फोटोज शेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
advertisement
2/6
दमदार कॉमेडी आणि अफलातून अभिनयामुळे चर्चेत राहिलेल्या श्रेयाने इन्स्टाग्रामवर पैठणी परिधान करून फोटो शेअर केले आहेत. ही पैठणी नेसून श्रेया कार्यक्रमात सामील झाली होती.
advertisement
3/6
शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्रेया खूपच सुंदर दिसत असून तिच्या मराठमोळ्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले. अभिनेत्रीच्या निखळ सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
advertisement
4/6
शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्रेयाने सोनेरी दागिने, गजरा, नथ, पैठणी आणि रंगीबेरंगी बांगड्या असा लूक केला होता. श्रेयाचा मराठमोळा लूक फोटोमध्ये अधिकच खुलून आला. श्रेयाच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले.
advertisement
5/6
‘आठवण. ….साठवण, गणपती बाप्पा मोरया……पुढच्या वर्षी लवकर या!’ असे कॅप्शन श्रेयाने या फोटोंना दिले आहे. श्रेयाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींकडूनही कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
advertisement
6/6
सध्या श्रेया बुगडे 'चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गँगवॉर' या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
Shreya Bugade : ‘लाफ्टर क्विन’ श्रेया बुगडेचा सोज्वळ साज; पाहा PHOTO