डोंबिवली बेकायदा रेरा घोटाळा 65 इमारत प्रकरणी अखेरीस कल्याण डोंबिवली महापालिकेनं कारवाईला सुरुवात करणार आहे. 65 अनधिकृत इमारतीपैकी समर्थ कॉम्प्लेक्सवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची कारवाई होणार हे आता अटळ आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता डोंबिवलीतील अहिरे गावात असलेल्या इमारतीवर पोलीस बंदोबस्तांसह पालिकेचे कर्मचारी कारवाई करणार आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, समर्थ कॉम्प्लेक्स नावाची ७ मजली इमारत जमीनदोस्त केली जाणार आहे. या इमारतीत ६० कुटुंबांना इमारत खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याआधीच पालिकेनं या ६० घरांना नोटीस बजावली होती. घरं रिकामी करण्यासाठी पोलिसांसह पालिकेने संयुक्त मोहीम राबवली जात आहे. कारवाईच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी रामनगर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
कल्याण डोंबिवली महापालिकेचे खोटे कागदपत्र सादर करत महारेराचे प्रमाणपत्र मिळवून या इमारती उभारण्यात आल्या होत्या. डोंबिवली कोपर येथील साई गॅलेक्सी या इमारतीमधील रहिवाशांची याचिका उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, न्यायालयााने याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर जून २०२५ मध्ये कल्याण डोंबिवली पालिकेनं इमारतीत राहणाऱ्या सगळ्या रहिवाशांनी इमारत खाली करण्याची नोटीस बजावली होती. कल्याण डोंबिवली पालिकेनं या इमारतींना नोटीस दिल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायचे असल्यानं इमारतींवर कारवाई केली जाणार आहे. रेरा अधिकारी, पालिका अधिकारी, भू माफिया आणि राजकीय मंडळी यांच्या अभ्रद्र संगनमताने हा महारेरा घोटाळा झाला होता.
विशेष म्हणजे, महारेरा मान्य प्रोजेक्ट असल्याचं सांगत बिल्डरांनी लोकांना घरं विकली. या लोकांना राष्ट्रीयकृत बँकांकडून लाखोंचं कर्जही देण्यात आलं होतं. पालिकेनं मालमत्ता करही गोळा केला. एवढंच काय तर प्रधानमंत्री आवास योजनेचा अनेकांना लाभ सुद्धा मिळाला. पण असं असताना आमच्या इमारती अनधिकृत असल्याचं समोर आल्यानंतर रहिवाशांना मोठा धक्का बसला. आता 6500 लोक बेघर होणार आहे. घोटाळे करणारे अधिकारी, बिल्डर मात्र मोकाट आहे. त्यामुळे हे पाप कुणाचं असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.