त्याने मला KISS करण्यासाठी..! कोणी केलं स्टार क्रिकेटरच्या बहिणीला टार्गेट, केला धक्कादायक खुलासा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Malti Chahar on Casting Cauch : 'बिग बॉस 19'मधील एक अभिनेत्री कास्टिंग काऊचची शिकार झाली आहे. दिग्दर्शकाने वाईट कृत्य केल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.
advertisement
1/7

'बिग बॉस 19' या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी विविध कारणाने हा शो चर्चेत आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकदेखील चर्चेत आहेत. 'बिग बॉस 19'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री करणारी भारतीय क्रिकेटर दीपक चाहरची बहिण आणि अभिनेत्री मालती चाहर सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
advertisement
2/7
मालती चाहर 'बिग बॉस 19'च्या घरातील एक लोकप्रिय खेळाडू होती. आपल्या सौंदर्यासह खेळाने तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 'बिग बॉस 19'च्या शर्यतीत ती शेवटपर्यंत होती. पण आता मालती पुन्हा चर्चेत आहे.
advertisement
3/7
मालती चाहरने सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत फिल्म इंडस्ट्रीतील आपल्या अनुभवांबाबत भाष्य केलं. मालतीने कास्टिंग काउचची शिकार झाल्याचा खुलासा केला. करिअरच्या सुरुवातीला मालती चाहरसोबत दिग्दर्शकाने वाईट कृत्य केलं होतं.
advertisement
4/7
मालती चाहर म्हणाली,"करिअरच्या सुरुवातीला माझ्या वडिलांच्या वयाच्या असणाऱ्या एका दिग्दर्शकाने मला किस करण्याचा प्रयत्न केला होता. एका प्रोजेक्ससाठी त्या दिग्दर्शकाला मला वारंवार भेटावं लागत होतं. पण प्रोजेक्टचं काम संपलं त्यादिवशी मी दिग्दर्शकाला भेटायला गेले तेव्हा त्याने माझ्यासोबत लिपलॉक करण्याचा प्रयत्न केला".
advertisement
5/7
कास्टिंग काऊचबद्दल बोलताना मालती चाहर म्हणाली,"तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार नसाल तर लुक टेस्टनंतर तुम्हाला रिप्लेस करण्यात येतं हे इंडस्ट्रीचं सत्य आहे. माझ्यासोबत हे अनेकदा घडलं आहे. पण आजवर कोणी मर्यादा ओलांडलेल्या नाहीत. पण मुलींसोबत खूप काही घडत असतं. पण कधीच कोणासमोर झुकता कामा नये".
advertisement
6/7
मालती चाहर एक सॉफ्टवेअर इंजीनिअर आहे. अनेक ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये तिने भाग घेतला आहे. 2009 मध्ये मालतीने 'मिस इंडिया अर्थ'चा किताब आपल्या नावे केला होता.
advertisement
7/7
मालती चाहर मॅनीक्योर, जीनियस आणि इश्क परमीना अशा अनेक चित्रपटांत झळकली आहे. मालती एक दिग्दर्शक, आर्टिस्ट आणि ट्रॅव्हलर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मालती चाहरची एकूण संपत्ती 3 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
त्याने मला KISS करण्यासाठी..! कोणी केलं स्टार क्रिकेटरच्या बहिणीला टार्गेट, केला धक्कादायक खुलासा