Gauri Ganpati: अवतरली, नवसाची गौराई माझी...! भांडूपच्या या कुटुंबातील गौरीची होतेय चर्चा, पाहा PHOTO
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Gauri Ganpati: बाप्पाच्या आगमनानंतर काही दिवसांनी माहेरवाशीन मानल्या जाणाऱ्या गौरीचं देखील आगमन होतं. यंदा 31 ऑगस्ट रोजी गौरी आगमन झालं आहे. गौरी आगमनानंतर तिची मनोभावे पूजा आणि सेवा केली जाते. अशाच परंपरेचा वारसा जपणारं भांडूप येथील काळे कुटूंब यंदा चर्चेत आलं आहे. कारण त्यांच्या घरची गौराई साक्षात आपल्याशी संवाद साधत असल्यासारखी भासते.
advertisement
1/7

यंदा गौरीपूजन 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या तीन दिवसांत, पहिल्या दिवशी आगमन आणि प्रतिष्ठापना केली जाते. दुसऱ्या दिवशी गौरींची पूजाकरून त्यांना नैवेद्य दाखवले जातात आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केलं जातं.
advertisement
2/7
ज्येष्ठा गौरी हे देवी पार्वतीचं एक रूप आहे. गौरींची पूजा केल्याने घरात समृद्धी आणि शांती नांदते, असं मानलं जातं. भांडूप येथील काळे कुटुंबीयांनी देखील सालाबादप्रमाणे आपल्या घरी गौराईचं स्वागत केलं आहे. त्यांच्या घरी गौरी गणपतीची मोठी परंपरा आहे.
advertisement
3/7
गौरीला माहेरवाशीण समजलं जातं. त्यामुळे वर्षातून एकदा माहेरी आलेल्या गौरींच्या मानपानात आणि पूजेत काळे कुटुंब कसलीही कसर ठेवत नाही. त्यांनी यावर्षी आपल्या गौरीला जांभळ्या रंगाची आणि चिंतामणी रंगाचे काठ असलेली भरजरी साडी नेसवली आहे.
advertisement
4/7
गौरीच्या आगमनासाठी काळे यांच्या घरी अतिशय आकर्षक आणि खऱ्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात गौरीची पूजा अतिशय साधेपणाने व्हायची, पण हळूहळू सोन्याचे दागिने, सुंदर साड्या आणि आकर्षक फुलांच्या आरासीत सजवण्याची प्रथा सुरू झाली.
advertisement
5/7
गौराईला सजवण्यासाठी पारंपरिक दागिन्यांचा साज चढवला आहे. पारंपरिक नथ, कर्णफुले, मोत्यांच्या माळा अशा दागिन्यांनी गौराईचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. कुटुंबातील सर्व महिला मिळून गौरीच्या पूजेत आणि सजावटीत सहभागी होतात.
advertisement
6/7
काळे यांच्या गौरीचं वैशिष्ट्य म्हणजे तिचा चेहरा अगदी जिवंत वाटतो. नऊवारी साडी आणि फेटा घातलेली गौरी आपल्याशी संवाद साधतेय, असा भास होते. गौरीचे डोळे पाणीदार आणि कमालीचे बोलके वाटतात.
advertisement
7/7
गौरी पूजेच्या दिवशी काळे कुटुंबात नातेवाईक, मित्रपरिवार आणि शेजारी यांचीही मोठी गर्दी असते. नातेवाईक आणि मित्रपरिवार दूरदूरहून ही गौरी पाहण्यासाठी येतात. सर्वांचं काळे कुटुंब अतिशय प्रेमाने आदरातिथ्य करतं. फोटो क्रेडिट- गणेश काळे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
Gauri Ganpati: अवतरली, नवसाची गौराई माझी...! भांडूपच्या या कुटुंबातील गौरीची होतेय चर्चा, पाहा PHOTO