महाराष्ट्रातलं 'हे' संपूर्ण गावच आहे शाकाहारी, लग्नानंतर मुली सोडतात मांसाहार
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
महाराष्ट्रातील हे संपूर्ण गाव शाकाहारी आहे. या गावात शेकडो वर्षांपासून मांसाहार केला जात नाही.
advertisement
1/6

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये रेणावी हे शुद्ध शाकाहारी गाव आहे. या गावात शेकडो वर्षापासून मांसाहार केला जात नाही. या गावामध्ये प्रसिद्ध आणि पवित्र रेवणसिद्धाचं देवस्थान आहे त्यामुळे इथं मांसाहार केला जात नाही. लग्नानंतर शाकाहारी राहावे लागले असं मान्य करूनच महिलांना गावात यावं लागत.
advertisement
2/6
या गावची लोकसंख्या 2,382 आहे. डोंगर कपारीत वसलेल्या या शाकाहारी गावाचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथं असणारं श्री रेवणसिद्ध नाथांचं पवित्र स्थान. नवनाथांपैकी एकनाथ हे स्वयंभू आणि अतिशय जागृत असलेलं मंदिर आहे. खूप पूर्वीपासून ही शाकाहारी भूमी म्हणून ओळखली जाते.
advertisement
3/6
संपूर्ण देशातून याठिकाणी भाविक येत असून नवसाला पावणारे हे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.अगदी वयोवृद्धही लोक श्रद्धेने याठिकाणी येतात. कोणत्याही अडचणी आल्या की ते देवाला नमस्कार करतात त्यातून त्यांना नक्की मार्ग मिळतो, अशी गावकऱ्यांची भावना आहे.
advertisement
4/6
रेणावी येथील रेवणसिद्धाची यात्रा महाशिवरात्री पासून सुरू होत आहे. दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा असल्याचा नावलौकिक आहे. राज्यातील एकमेव गाव शाकाहारी गाव आहे.
advertisement
5/6
सोने -चांदीच्या व्यवसायानिमित्त गावातील लोक देशभर विखुरलेले आहेत. तरीही ते शाकाहारी आहेत. गावात लग्नानंतर येणाऱ्या मुलींनाही शाकाहारी राहावं लागेल हे मान्य करावं लागतं.
advertisement
6/6
विटा नगरपरिषदेच्या हद्दीत रेवणसिद्ध मूळस्थान आणि त्या ठिकाणी मंदिर आहे. मंदिराच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तरेला दरवाजे आहेत. उत्तराभिमुख असलेले हे मंदिर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
महाराष्ट्रातलं 'हे' संपूर्ण गावच आहे शाकाहारी, लग्नानंतर मुली सोडतात मांसाहार