Ganesh Chaturthi 2024: 16 हत्ती, 60 घंटा,15 मोठे त्रिशुळ आणि 10 फुटांचा नंदी, पुण्यातलं असंही गणेश मंडळ
- Written by:Chandrakant Funde
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ganesh Chaturthi 2024 : पाषाणात कोरलेल्या पुरातन शिवालयात पुण्यातील अखिल मंडई मंडळाचे शारदा गजानन बाप्पा विराजमान झाले आहेत. मंडळाच्या वतीने यंदा 'दगडांवर कोरलेल्या लेण्यांमधील महादेवाचे भव्य शिवालय' असा देखावा करण्यात आला आहे.
advertisement
1/6

यामध्ये महादेवाची भव्य पिंड आणि त्यावर सतत जलाभिषेक हे देखाव्याचे विशेष आकर्षण आहे. मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा 131 वे वर्ष आहे.
advertisement
2/6
गणरायाची प्राणप्रतिष्ठापना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि त्यांच्या पत्नी अंजली काळकर यांच्या शुभहस्ते झाली.
advertisement
3/6
या वेळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, कार्याध्यक्ष अभय थोरात, उपाध्यक्ष मिलिंद काची, सचिव विश्वास भोर, देविदास बहिरट, जयंत किराड, मधुकर सणस, अॅड.प्रताप परदेशी, सूरज थोरात, विकी खन्ना उपस्थित होते.
advertisement
4/6
मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेल्या शिवालयात 16 हत्ती, 60 लहान मोठ्या आकाराच्या घंटा, 15 मोठे त्रिशुळ, मंडपाच्या मध्यभागी 10 फुटाचा नंदी, महादेव आणि पार्वतीचे भव्य चित्र लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
5/6
कला दिग्दर्शक विशाल ताजणेकर व त्यांचे सहकारी गजेंद्र पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली 60 कुशल कारागिरांनी 1 महिन्यापासून काम करून भव्य शिवालय साकारले आहे.
advertisement
6/6
अण्णा थोरात म्हणाले, ज्या ठिकाणी शिवलिंग स्थापित असते, त्याला शिवालय असे म्हटले जाते. मंडळाच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या शिवालयात आल्यावर दगडामध्ये कोरलेल्या प्राचीन मंदिरात आल्याचा अनुभव भाविकांना होणार आहे. अतिशय बारकाईने कलाकारांनी सजावटीचे काम केले आहे. भव्य शंकराची पिंड आणि त्यावरील जलाभिषेक विशेष आकर्षण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Ganesh Chaturthi 2024: 16 हत्ती, 60 घंटा,15 मोठे त्रिशुळ आणि 10 फुटांचा नंदी, पुण्यातलं असंही गणेश मंडळ