TRENDING:

Afghan Apple: ‘पहलगाम’नंतर पाकचा रस्ता बंद, समुद्र मार्गानं अफगाणी सफरचंद पुण्यात, किलोचा भाव काय?

Last Updated:
Afghan Apples: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे अफगाणी सफरचंद सुमद्रमार्गे भारतात दाखल झाले आहेत.
advertisement
1/7
‘पहलगाम’नंतर पाकचा रस्ता बंद, समुद्र मार्गानं अफगाणी सफरचंद पुण्यात, किलोचा भाव
भारत-पाकिस्तान संघर्षाचा परिणाम फळबाजारावर देखील झाला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर वाघा बॉर्डर बंद असून अफगाणिस्तानातून भारतात येणाऱ्या सफरचंदांच्या वाहतुकीचा मार्ग बदलला आहे. पूर्वी पाकिस्तानमार्गे रस्त्याने येणारे सफरचंद आता इराणमधून समुद्रमार्गे मुंबईत दाखल होत आहे.
advertisement
2/7
मुंबईतून हे अफगाणी सफरचंद पुण्यासह भारतातील इतर फळ बाजारांत देखील पोहोचत आहे. समुद्री मार्गामुळे वाहतूक खर्चात वाढ झाली असली तरी हाताळणी कमी झाल्याने फळांचा दर्जा उत्कृष्ट राहिला आहे. पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात या सफरचंदांना चांगली मागणी आहे.
advertisement
3/7
गुलटेकडी मार्केटमध्ये यंदा देशी सफरचंदांचा पुरवठा घटला आहे. हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सफरचंद बागांना मोठा फटका बसला. स्थानिक उत्पादन घटल्याने बाजारात या परदेशी सफरचंदांना मागणी वाढली आहे. ही जागा अफगाणिस्तानातील सफरचंदांनी घेतली असून ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.
advertisement
4/7
सध्या अफगाणी सफरचंदाचा घाऊक दर 10 किलोसाठी 900 ते 1100 रुपये इतका आहे. तर किरकोळ बाजारात प्रतिकिलो 130 ते 160 रुपयांपर्यंत विकले जात आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या दरात 100 ते 150 रुपयांची वाढ झाली आहे.
advertisement
5/7
यंदा हिमाचल आणि काश्मीरमधील सफरचंदांचा हंगाम 15 दिवस आधी संपला. त्यामुळे अफगाणी सफरचंदाची आवक वेळेआधीच सुरू झाली. दररोज जवळपास 6 हजार पेट्या अफगाणी सफरचंदांची आवक होत आहे. यात लाल, गोल्डन आणि विविध दर्जाच्या सफरचंदांचा समावेश आहे.
advertisement
6/7
फळ व्यापारी सुयोग झेंडे सांगतात की, अफगाणिस्तानमध्ये पिकणारे सफरचंद पूर्वी पाकिस्तानमार्गे आटारी बॉर्डर ओलांडून भारतात येत होते. सध्या दोन राष्ट्रांतील तणावामुळे हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील फळे तिथून बंदरांपर्यंत पोहोचवून समुद्रमार्गे थेट मुंबईत पाठवली जातात.
advertisement
7/7
समुद्रमार्गामुळे वाहतूक खर्च किंचित वाढला असला तरी सफरचंदांची हाताळणी कमी झाली आहे. त्यामुळे फळांचा दर्जा अधिक चांगला राहतो. यंदा अफगाणी सफरचंदांची गुणवत्ता उत्तम आहे. फळे अधिक ताजी, चमकदार आणि टिकाऊ असल्याने ग्राहकांचा कल यांच्याकडे वाढला आहे, असंही झेंडे सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Afghan Apple: ‘पहलगाम’नंतर पाकचा रस्ता बंद, समुद्र मार्गानं अफगाणी सफरचंद पुण्यात, किलोचा भाव काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल