TRENDING:

Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; मोठे निर्णय यशस्वी, नाव-पैसा दोन्ही

Last Updated:
Weekly Horoscope: नवा आठवडा काही राशींच्या लोकांसाठी खास असू शकतो. या आठवड्याच्या सुरुवातीला बुध वृश्चिक राशीत वक्री होईल, 11 नोव्हेंबर रोजी गुरु कर्क राशीत वक्री होईल आणि 16 नोव्हेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल. इतर ग्रहांची स्थिती म्हणजे चंद्र कर्क राशीतून कन्या राशीत संक्रमण करेल. मंगळ वृश्चिक राशीत, शुक्र तूळ राशीत, राहू कुंभ राशीत, केतू सिंह राशीत आणि शनि मीन राशीत वक्री होईल. याचा सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींवरील साप्ताहिक परिणाम पाहुया.
advertisement
1/7
सिंह कन्या तूळ वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; मोठे निर्णय यशस्वी, नाव-पैसा
सिंह रास (Leo) - हा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरेल. या आठवड्यात उत्पन्नाचे नवीन स्रोत तर निर्माण होतीलच, पण एका वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने प्रियजनांसोबतचे गैरसमज दूर होतील. नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामाच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या दूर होतील, तर व्यावसायिक लोकांसाठी प्रवास त्यांच्या प्रगती आणि फायद्याचं मोठं कारण ठरेल. आठवड्याच्या पूर्वार्धात मोठी कौटुंबिक समस्या सुटल्याने तुम्हाला सुटकेचा श्वास घेता येईल. मात्र, आठवड्याचा मध्यभाग संबंधांच्या दृष्टीने थोडा प्रतिकूल असेल. अशा परिस्थितीत या काळात तुम्ही तुमच्या नातेवाईकांशी नम्रपणे वागा आणि छोट्या गोष्टींचा मोठा मुद्दा बनवणं टाळा. या काळात जवळच्या नातेवाईकांशी एखाद्या गोष्टीवरून वाद किंवा मतभेद होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांनी या आठवड्यात कामातील बदलांसंबंधी घाईघाईत निर्णय घेणं टाळावं. प्रेमसंबंधात अनुकूलता राहील. प्रेम जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. परस्पर सलोखा आणि प्रेम वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात कुटुंबासोबत पिकनिक पार्टीचा कार्यक्रम होऊ शकतो.
advertisement
2/7
कन्या रास (Virgo) - हा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी थोडा चढाओढाचा असणार आहे. या आठवड्यात या राशीचे लोक स्वतःला कोंडीत सापडल्यासारखं अनुभवतील. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. कोणत्याही कामात अडथळा किंवा अडचण आल्यास, तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. या काळात लवकर पैसे कमवण्याचा किंवा शॉर्टकटने यश मिळवण्याचा मार्ग टाळा; अन्यथा, तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी तुम्हाला या आठवड्यात पैशांचं व्यवस्थापन करण्याची गरज आहे.
advertisement
3/7
कन्या - जमीन-जुमला खरेदी-विक्री किंवा कोणत्याही प्रकल्पात पैसा गुंतवण्याचा विचार करत असाल, तर तसं करण्याआधी तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घ्यायला विसरू नका. आठवड्याच्या उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्या आणि हंगामी आजारांपासून अधिक सावध राहा, तसेच नशेपासून दूर राहा. या काळात तुमच्या आरोग्यासोबतच तुमच्या जोडीदाराचं बिघडलेलं आरोग्य देखील तुमच्या चिंतेचं मोठं कारण बनू शकतं. चांगला प्रेमसंबंध टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या प्रेम जोडीदाराच्या भावनांचा आदर करा.
advertisement
4/7
तूळ रास (Libra)हा आठवडा तूळ राशीसाठी खूप शुभ असणार आहे. या आठवड्यात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि धनवृद्धी वेगाने होईल. जर तुम्ही समाजसेवा किंवा राजकारणाशी जोडलेले असाल, तर आठवड्याच्या पूर्वार्धात तुम्हाला विशेष उपलब्धी मिळू शकते. या काळात तुमचा मान आणि पद वाढेल. समाजात तुमची लोकप्रियता वाढेल. तुम्ही घेतलेल्या निर्णयांची लोक प्रशंसा करतील. या काळात तुम्हाला मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.
advertisement
5/7
तूळ - वडिलोपार्जित संपत्ती मिळण्यात असलेले अडथळे आपोआप दूर होताना दिसतील. जर तुम्ही उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल, तर आठवड्याच्या मध्यभागी या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. जर तुम्ही परदेशात व्यवसायाच्या कारकिर्दीसाठी प्रयत्न करत असाल, तर या आठवड्यात तुम्हाला तिथे चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. हा संपूर्ण आठवडा प्रेमसंबंधांसाठी अनुकूल आहे. या आठवड्यात तुमचा प्रेम जोडीदार तुमच्यावर भरपूर प्रेम करताना दिसेल. वैवाहिक जीवनात आनंद कायम राहील.
advertisement
6/7
वृश्चिक रास (Scorpio)वृश्चिक राशीच्या लोकांनी या आठवड्यात आपल्या विरोधकांपासून खूप सावध राहण्याची गरज आहे. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक कट रचताना दिसतील. लोक इतरांसमोर गोष्टी वाढवून सांगण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही तणाव न घेता, तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं योग्य ठरेल. आठवड्याच्या पूर्वार्धात तुम्हाला कामाच्या ठिकाणच्या मानसिक ताण असेलच शिवाय तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची चिंताही कराल.
advertisement
7/7
वृश्चिक - आठवड्याच्या मध्यभागी कामाच्या संदर्भात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास शक्य आहे. प्रवासादरम्यान तुमच्या आरोग्य आणि सामानाची विशेष काळजी घ्या आणि गाडी काळजीपूर्वक चालवा. उपजीविकेसाठी भटकणाऱ्या लोकांची प्रतीक्षा थोडी वाढू शकते. जर तुमचा तुमच्या प्रेम जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल, तर तुम्हाला स्वतःहून पुढाकार घेऊन नातं पुन्हा मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जवळचे संबंध सुधारण्यासाठी संवादाची मदत घ्या आणि तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात अहंकार येऊ देऊ नका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; मोठे निर्णय यशस्वी, नाव-पैसा दोन्ही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल