TRENDING:

ऑडी कार अन् लाल दिवा भोवला, पूजा मॅडमची अशी गेली 'IAS' खुर्ची, INSIDE STORY

Last Updated:
खासगी गाडीवर लाल दिवा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी IAS अधिकारी झालेल्या पूजा खेडकर बाईंना अखेर केंद्र सरकारने घरचा रस्ता दाखवला आहे.
advertisement
1/7
ऑडी कार अन् लाल दिवा भोवला, पूजा मॅडमची अशी गेली 'IAS' खुर्ची, INSIDE STORY
आयएएस, आयपीएस अधिकारी होण्याचं स्वप्न अनेक जण पाहतात, पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं तेव्हा कुठे जाऊन लाल दिव्याची गाडी मिळत असते. पण पुण्यातील पूजा खेडकर या बाई या सगळ्या प्रशासकीय प्रक्रियेत नटवरलाल निघाल्या. बनावट प्रमाणपत्र देऊन पूजाबाईंनी IAS अधिकारी पद मिळवलं. पण अखेरीस जेव्हा खोटेपणा समोर आला तेव्हा पूजाबाईंना केंद्र सरकारने टाटा, बाय-बाय करण्याचा निरोप दिला.
advertisement
2/7
पूजा ही 2023 बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी असल्याचं सांगितलं गेलं. जून 2024 महिन्यात त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला होता. परंतु नियुक्तीपासूनच त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्या होत्या.
advertisement
3/7
त्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. त्यांचे आजोबा (आईचे वडील) जगन्नाथराव बुधवंत हे आयएएस अधिकारी होते. तर, वडील दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर वंचितच्या पाठिंब्यावर ते अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली होती. तर, आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.
advertisement
4/7
कोणत्याही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याला दोन वर्षांचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो. या काळात संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये काम करावे लागते. त्यानंतर कामाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते. याप्रमाणेच IAS असलेल्या डॉ. पुजा दिलीप खेडकर यांना 3 जून 2024 पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात परिवाक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आलं होतं.
advertisement
5/7
मात्र, पूजा खेडकर हिने खासगी ऑडी कारवर अंबर दिवा लावला आणि महाराष्ट्र सरकारचं चिन्ह लावलं होतं. त्यांच्या कारनाम्याचे फोटो व्हायरल झाले होते.  स्वत:ला गरीब आणि दृष्टीदोष असल्याचं सांगणाऱ्या अधिकारी इतक्या महागड्या ऑडी कारमधून कशा फिरतात असा प्रश्न उपस्थितीत झाला होता.
advertisement
6/7
पण डॉ. पुजा खेडकर यांना जिथे नियुक्ती मिळाली, त्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांश अधिकारी हे मात्र प्रमोटेड. मग काय जॉईन होण्याआधीच आयएएस असलेल्या शिकाऊ कलेक्टर मॅडमांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे डिमांड सुरू केल्या.बसायला एक स्वतंत्र कार्यालय, ये-जा करायला अंबर दिव्याची गाडी आणि दिमतीला शिपाई तैनात करण्याचं फर्मान मॅडमांनी सोडलं. बरं मॅडमांना जिल्हाधिकाऱ्यांच्या शेजारचेच स्वतंत्र कॅबिन हवं होतं, त्यासाठी मग त्यांनी थेट अप्पर जिल्हाधिकारी मोरे यांच्या अँटी चेंबर्सवरच ताबा मिळवला, त्यावर नावाची पाटीही लावून टाकली होती.
advertisement
7/7
वाद वाढल्यानंतर तिची वाशिमला बदली सुद्धा करण्यात आली होती. अखेरीस आता केंद्र सरकारने पोलिसांच्या तपासानंतर पूजा खेडकर बाईंना घरी पाठवलं आहे. 6 सप्टेंबर 2024 च्या आदेशानुसार केंद्र सरकारने पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांना IAS प्रोबेशनर प्रशासकीय सेवेतून तात्काळ कार्यमुक्त केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
ऑडी कार अन् लाल दिवा भोवला, पूजा मॅडमची अशी गेली 'IAS' खुर्ची, INSIDE STORY
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल