Unseasonal Rain: फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग, 10पेक्षा जास्त जिल्ह्यांना यलो अलर्ट!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Maharashtra Weather Update: राज्यात थंडीचा जोर चांगलाच वाढायला लागला होता अशात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ उठलं. या चक्रीवादळाच्या प्रभावानं राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. हवामान विभागानं 4 डिसेंबरपासून 3 दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. आज, 5 डिसेंबर रोजी राज्यात अंदाजे तापमान किती असेल जाणून घेऊया. (प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी / पुणे)
advertisement
1/5

मुंबई शहर आणि उपनगरात आभाळ ढगाळ असण्याची शक्यता आहे. मुंबईच्या किमान तापमानात दिवसागणिक वाढ होतेय. 5 डिसेंबरला इथलं कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना थंडीच्या महिन्यातही घामाच्या धाराच सोसाव्या लागणार आहेत. पुण्यात आज हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. त्यानंतर काही दिवस आभाळ ढगाळ असेल. आज पुण्याचं कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये हवामान विभागानं हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. इथलं कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. तर, काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
3/5
विदर्भात नागपूरमध्ये आज धुक्यासह ढगाळ वातावरण असेल. वाशिममध्ये हलका पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलीये. आज नागपूरचं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 17 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/5
उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये आज कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअस असू शकतं. दिवाळीनंतर थंडीचा सर्वाधिक जोर नाशिकमध्ये जाणवला, परंतु आता मात्र इथल्या किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीचा जोर काहीसा ओसरलाय.
advertisement
5/5
फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे. 5 डिसेंबरसाठी या जिल्ह्यांना यलो अलर्टदेखील देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Unseasonal Rain: फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग, 10पेक्षा जास्त जिल्ह्यांना यलो अलर्ट!