Pune Rain: पुण्यात तुफान आलंय! 3 तासांच्या पावसाने हाहाकार, 7 ठिकाणाचे भयानक PHOTOS
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुणे शहराच्या विविध भागांत सतत पावसाची नोंद होत असून त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. पावसामुळे काही ठिकाणी मोठे नुकसान झालं आहे.
advertisement
1/7

पुण्यात मागील काही दिवसांपासून वादळी पावसाने जोर धरला आहे. शहराच्या विविध भागांत सतत पावसाची नोंद होत असून त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. आज 3 तास झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी मोठे नुकसान झालं आहे.
advertisement
2/7
सनसवाडी पुणे-नगर महामार्गावर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एक मोठं होर्डिंग कोसळलं. या होर्डिंगखाली सात ते आठ दुचाकी सापडल्या. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
advertisement
3/7
याशिवाय, धानोरी परिसरात पोरवाल रोडवर देखील एक बॅनर कोसळल्याची घटना समोर आली आहे. पावसाचा परिणाम केवळ शहरातच नव्हे तर पुणे विमानतळावरही पाहायला मिळाला.
advertisement
4/7
विमानतळाच्या टर्मिनलमध्ये पावसाचं पाणी गळाल्याचं पाहिला मिळत आहे. याचबरोबर विमानतळाच्या परिसरात ड्रेनेजमधील पाणी देखील रस्त्यावर आल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.
advertisement
5/7
फुरसुंगी रोडवरही एक बॅनर कोसळल्याची घटना घडली आहे. अवघ्या तासभराच्या पावसानंतर शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी होर्डिंग कोसळले. सुदैवाने कोणतीही जखमीची नोंद झाली नाही.
advertisement
6/7
कोथरूडमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे तळ्याचे स्वरूप पाहिला मिळालं. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला आहेत.
advertisement
7/7
दरम्यान, हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी पुढील काही दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. प्री-मान्सून पावसामुळे शहरात पावसाळ्यापूर्वी ची कामे आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Rain: पुण्यात तुफान आलंय! 3 तासांच्या पावसाने हाहाकार, 7 ठिकाणाचे भयानक PHOTOS