TRENDING:

पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता, साताऱ्याला आज यलो अलर्ट

Last Updated:
विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला आज 21 ऑक्टोबरला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5
पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता, साताऱ्याला आज यलो अलर्ट
महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला आज 21 ऑक्टोबरला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
2/5
पुणे शहराचे हवामान ढगाळ राहून मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला. तसेच घाट विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर पुढील दोन दिवस पुणे शहरात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुण्यात 29 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/5
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये संततधार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचे आगार मानल्या जाणाऱ्या पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड तालुक्यामध्ये यंदा जोरदार पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोल्हापूरमध्ये 27 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यासाठी हवामान विभागानं पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. साताऱ्यात आणखी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. साताऱ्यात 25 अंश सेल्सिअस कमाल तर 19 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/5
सांगली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व भागात कधी उन, तर कधी हलका पाऊस पडत आहे. या आठवड्यात सांगली जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळणार असून नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात येत आहे. सांगली मध्ये 27 अंश सेल्सिअस कमाल तर 18 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. तर सोलापूरमध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता, साताऱ्याला आज यलो अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल