Vande Bharat Sleeper Train: आनंदाची बातमी! लवकर 2 नवीन स्लीपर वंदे भारत ट्रेन धावणार, कुठे-कुठे थांबणार?
Last Updated:
Vande Bharat Sleeper Train : स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. जर तुम्ही याने प्रवास करायचा विचार करत असाल तर ही अपडेट नक्की वाचा.
advertisement
1/6

भारताची पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन हावडा ते कामाख्या या मार्गावर सुरू झाली असून तिला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही ट्रेन जवळपास 100 टक्के क्षमतेने धावत आहे.
advertisement
2/6
प्रवाशांकडून मिळणाऱ्या सूचनांनुसार भारतीय रेल्वे सेवेत आवश्यक बदलही करत आहे.आता आणखी स्लीपर वंदे भारत गाड्या सुरू करण्याची तयारी वेगात सुरू आहे.
advertisement
3/6
मीडिया रिपोर्टनुसार मार्च 2026 अखेरपर्यंत दोन नवीन स्लीपर वंदे भारत ट्रेन रेल्वेच्या ताफ्यात दाखल होऊ शकतात. या गाड्यांची निर्मिती चेन्नई येथे केली जात आहे.
advertisement
4/6
मूळ करारानुसार 16 कोचचे 10 रेक मार्चपर्यंत द्यायचे होते. मात्र सध्या सर्व रेक वेळेत पूर्ण होणे कठीण असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे अंतिम मुदत वाढवली जाऊ शकते.
advertisement
5/6
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मार्च अखेरपर्यंत तिसरा आणि चौथा रेक तयार होण्याची शक्यता आहे. राहिलेले रेक दरमहा एक अशा गतीने देण्याचा प्रयत्न राहील.
advertisement
6/6
भविष्यात 24 कोचचे, पेंट्री कारसह स्लीपर वंदे भारत रेक तयार करण्याचीही योजना आहे. दिल्ली-अमृतसर, दिल्ली-श्रीनगर, दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता या मार्गांवर या गाड्या सुरू करण्याचा विचार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Vande Bharat Sleeper Train: आनंदाची बातमी! लवकर 2 नवीन स्लीपर वंदे भारत ट्रेन धावणार, कुठे-कुठे थांबणार?