TRENDING:

Pune : अजून काय पाहिजे? पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात बॅनर, कष्टाळू कार्यकर्ता कोण?

Last Updated:
चंद्रकांत फुंदे, पुणे : पुण्यात लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ इच्छुक असून आता त्यांच्याविरोधात पक्षात नाराजी दिसून येतेय. अज्ञातांकडून महापालिकेच्या परिसरात मोहोळ यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली होती.
advertisement
1/5
Pune : अजून काय पाहिजे? पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात बॅनर
पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात अज्ञातांकडून महापालिकेसमोर बॅनरबाजी करण्यात आलीय. तुला महापौर केले, स्थाई समितीचे अध्यक्ष केले, पक्षाचे सरचिटणीस केले... तुला आणखीन काय पाहिजे अशा आशयाचा फ्लेक्स पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अज्ञातांकडून लावण्यात आला होता.
advertisement
2/5
फ्लेक्सवर भाजपचे कमळ हे चिन्ह देखील छापण्यात आले होते. हा फ्लेक्स भाजपमधील कोणी लावला की आणखी कोणी हे समजु शकलेले नाही. महापालिकेच्या सुरक्षारक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर हा फ्लेक्स काढण्यात आला.
advertisement
3/5
दरम्यान, बॅनरबाजीमुळे पुण्यातील भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. महापालिकेच्या जवळ मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आले होते.
advertisement
4/5
मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात लावण्यात आलेल्या या बॅनरवर म्हटलं होतं की, स्टैंडिंग दिली , महापौर केलं , सरचिटणीस पण दिलं, आता खासदारकी पण ? आता बास झालं तुला नक्की पडणार ---- कष्टाळू भाजप कार्यकर्ते.
advertisement
5/5
मुरलीधर मोहोळ यांनी या पक्षांतर्गंत वादातून झालेल्या बॅनरबाजीवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. ते आज शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी गेले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune : अजून काय पाहिजे? पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात बॅनर, कष्टाळू कार्यकर्ता कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल