Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा वारं फिरलं, 24 तास धोक्याचे, 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
1/7

महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. राज्यात उष्णतेची लाट अन् अवकाळी पावसाचं दुहेरी संकट घोंघावत आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा धोका असून मुंबईसह 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पाऊस अन् गारपिटीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 23 मार्च रोजीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
कोकणातील अवकाळी पावसाचा धोका संपला असला तरी पुन्हा नवं संकट आलं आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी कमाल तापमानाचा पारा 29 ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर दमट हवामानामुळे उकाडा जास्त राहील.
advertisement
3/7
मध्य महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट घोंघावत आहे. सोलापूरसह, सातारा आणि सांगली भागात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर पुणे, अहिल्यानगर, कोल्हापुरात देखील हलक्या पावसाचा अंदाज आहे, या काळात पुण्यातील तापमानाचा पारा 31 ते 33 अंश सेल्सिअसपर्यंत राहील.
advertisement
4/7
मराठवाड्यावर देखील अवकाळीचे काळे ढग पुन्हा दाटले आहे त. सोमवारी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहून विजांसह पाऊस होईल. तर बीड, हिंगोली आणि नांदेडमध्ये देखील हलक्या पावसाची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगरसह जालना आणि परभणी जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील. तापमानाचा पारा चढण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
विदर्भात हवामान मुख्यत: उष्ण आणि कोरडे राहील. कमाल तापमान 35-37 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. सोमवारी पावसाचा कोणताही इशारा नाही. पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा चढणार असून 25 मार्चपासून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
6/7
उत्तर महाराषट्रात देखील हवापाटल जाणवत आहे. नाशिकसह, धुळे, नंदुरबार आणि जळगावचा पारा चढणार आहे. या भागात पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यावर पुढील काही दिवस उष्णतेची लाट आणि वादळी पाऊस असं संकट राहील. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील. तसेच तापमानात 2-4 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा वारं फिरलं, 24 तास धोक्याचे, 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट