TRENDING:

Weather Alert: धोक्याची घंटा! पश्चिम महाराष्ट्रात धो धो कोसळणार, पुणे, सोलापूरसह 5 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather alert: महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून पश्चिम महाराष्ट्रात देखील धो धो सुरू आहे. आज पुणे, सोलापूरसह सर्वच जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/7
धोक्याची घंटा! पश्चिम महाराष्ट्रात धो धो कोसळणार, पुणेसह 5 जिल्ह्यांना अलर्ट
बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. आज 27 सप्टेंबर रोजी कोकण, घाटमाथा, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने काही ठिकाणी दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही आज मुसळधार पावसाची शक्यता असून पुणे, सोलापूरसह 5 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 6.2 पावसाची नोंद झाली. यावेळी 26.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज पुणे जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्‍यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट आहे.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात देखील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 24 तासात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात शुक्रवारपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता असून पुढील काही काळासाठी यलो अलर्ट दिला आहे. तर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट असेल.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा कोसळण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पूरग्रस्त नागरिकांची चिंता वाढली असून आज शनिवारी, 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट तर पुढील 24 तासासाठी जोरदार पावसाचा यलो अलर्ट आहे. करमाळा, परांडा, बार्शी, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर या परिसरातील पुरस्थिती चिंताजनक आहे.
advertisement
6/7
सांगली शहर परिसरात दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. पुढील 24 तासात जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील चार दिवस सांगली जिल्ह्यातील पावसाचा अंदाज असल्याने काढणीला आलेल्या भुईमूग, सोयाबीन, कडधान्यांसह भात पिकाला धोका निर्माण झाला आहे.
advertisement
7/7
पुढील चार दिवस राज्यात पावसाचे वातावरण कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत 27 सप्टेंबर रोजी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पुणे, कोल्हापूर, सातारा घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि हवामान विभागाचे अपडेट पाहावेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: धोक्याची घंटा! पश्चिम महाराष्ट्रात धो धो कोसळणार, पुणे, सोलापूरसह 5 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल