TRENDING:

Weather Alert: विजा, वारा अन् वादळी पाऊस, रविवारी पुन्हा धुमशान, पुणे ते सोलापूर यलो अलर्ट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. रविवारी पुणे ते सोलापूर 4 जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/7
विजा, वारा अन् वादळी पाऊस, रविवारी पुन्हा धुमशान, पुणे ते सोलापूर यलो अलर्ट
‘ऑक्टोबर हीट’मध्ये तापणाऱ्या महाराष्ट्रावर अवकाळी संकट घोंघावत आहे. राज्यातील बर्‍याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. आज 26 ऑक्टोबर रोजी राज्यात मेघगर्जना विजांसह वादळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाने आज 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील रविवारचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील काही भागात शनिवारी पावसाने हजेरी लावली. तर 29.0 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 29 अंशावर राहील. हवामान विभागाने घाटमाथ्यासह पुणे जिल्ह्यासाठी पुढील 48 तास यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
3/7
गेल्या 24 तासात सातारा जिल्ह्यात 27.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची आणि 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज संपूर्ण साताऱ्यासह घाटमाथ्यावर विजांसह पावसाची शक्यता असून हवामान विभागाने 72 तासांसाठी यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
4/7
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शनिवारी पावसाने हजेरी लावली. तर 27.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मात्र, हवामान विभागाने आज कोणताही महत्त्वाचा अलर्ट दिलेला नाही.
advertisement
5/7
शनिवारी सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असून 23 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर तापमानाचा पारा बत्तीशीपार राहिला. आज सोलापूर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील 48 तासांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात शनिवारी 27.8 अंश सेल्सिअस तापमानाची तर 18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज जिल्ह्यात विजांसह पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला असून यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच आज उष्णतेचा पारा आणखी चढण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात विजांसह गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बहुतांश भागात पारा तिशीपार राहण्याची शक्यता असून कोल्हापूर वगळता सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: विजा, वारा अन् वादळी पाऊस, रविवारी पुन्हा धुमशान, पुणे ते सोलापूर यलो अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल