TRENDING:

Weather Alert : पुढील 24 तास धोक्याचे, महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळणार, 15 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राचा प्रभाव म्हणून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पाहुयात राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
1/7
पुढील 24 तास धोक्याचे, महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळणार, 15 जिल्ह्यांना अलर्ट
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राचा प्रभाव म्हणून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील एकूण 15 जिल्ह्यांना हवामान विभागाने 4 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. पाहुयात राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये साधारणपणे ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमान 30 अंश सेल्शिअस किमान तापमान 24 अंश सेल्शिअसच्या दरम्यान असेल, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही ढगाळ आकाशासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
4/7
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि 30 ते 40 किमी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यातील एकूण सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली हे ते सहा जिल्हे आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्येही विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शकतो.
advertisement
6/7
विदर्भातील एकूण सात जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. यलो अलर्ट जारी असलेल्या या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो.
advertisement
7/7
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात पावसाने राज्यभर जोरदार बॅटिंग केल्यानंतर काही काळासाठी पाऊस कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे, परंतु बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचे पुन्हा आगमन होत असल्याचे पाहायला मिळते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : पुढील 24 तास धोक्याचे, महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळणार, 15 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल