TRENDING:

Weather Alert : पुढील 24 तास महत्त्वाचे, महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
 मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विभागानुसार हवामान कसं असेल, पाहुयात.
advertisement
1/7
 पुढील 24 तास महत्त्वाचे, महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्रात रविवारी 29 मार्च रोजी अवकाळी संकट कायम आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उष्ण हवामान पाहायला मिळेल. तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विभागानुसार हवामान कसं असेल, पाहुयात.
advertisement
2/7
कोकण विभागात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. या भागात कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 ते 26 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल जाणवण्याची शक्यता आहे. या भागात कमाल तापमान 34 ते 37 अंश तर किमान तापमान 20 ते 23 अंशांच्या दरम्यान राहील. दुपारनंतर काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज असून, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील हवामान उष्ण आणि कोरडे राहील. नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत उष्णतेचा पारा चढणार आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 34-36 अंश राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, परभणी, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या भागात कमाल तापमान 36 ते 39 अंशांपर्यंत जाऊ शकते तर किमान तापमान 22 ते 25 अंशांच्या दरम्यान राहील. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक उष्णतेची नोंद होण्याचा अंदाज आहे. या भागात कमाल तापमान 38 ते 41 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून, किमान तापमान 24 ते 27 अंशांच्या दरम्यान राहील.
advertisement
7/7
महाराष्ट्रात उष्ण आणि कोरडे हवामान कायम आहे. काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : पुढील 24 तास महत्त्वाचे, महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल