Weather Alert: पुढील 24 तास धोक्याचे! राज्यात धो धो पावसाचा हवामान विभागाकडून अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
कोकण विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. पाहुयात 29 जून रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
1/7

राज्यातील विविध भागांत कमी पाऊस झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यातील विविध भागांतून पावसाने काढता पाय घेतला आहे.
advertisement
2/7
29 जून रोजीही विदर्भात कुठलीही पावसाची शक्यता नाही. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. कोकण विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. पाहुयात 29 जून रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
3/7
मुंबईत एक ते दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई या तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
4/7
पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा या दोन्ही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्यान पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापूर घाटमाथ्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर उर्वरित जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
छत्रपती संभाजीनगरमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी आणि इतर उर्वरित जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
6/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक घाटमाथ्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील इतर उर्वरित जिल्ह्यांत म्हणजेच धुळे, नंदुरबार, जळगाव याठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
7/7
विदर्भात कुठलीही पावसाची शक्यता नाही. सर्वच जिल्ह्यांत स्वच्छ सूर्यप्रकाश राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत राज्यातील हवामानाचा अंदाज बघता असे लक्षात येते की, राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर कमी झालेला दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच शेतीची कामे करणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पुढील 24 तास धोक्याचे! राज्यात धो धो पावसाचा हवामान विभागाकडून अलर्ट