Weather Alret : महाराष्ट्रावर आता धुळीचं संकट, वातावरणही बिघडलं, हवामान खात्याने दिला अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
27 नोव्हेंबर रोजी राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने राज्यात थंडी पूर्णपणे ओसरली आहे.
advertisement
1/7

27 नोव्हेंबर रोजी राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने राज्यात थंडी पूर्णपणे ओसरली आहे. राज्यात अंशतः ढगाळ वातावरण झाले असून उन्हाचा चटका कायम आहे. 27 नोव्हेंबर रोजी ही राज्यात तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. पाहुयात 27 नोव्हेंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
मुंबईत 27 नोव्हेंबर रोजी निरभ्र आकाश राहून वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. कोकण विभागात देखील मुख्यतः निरभ्र आकाश राहून वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरात मुख्यतः निरभ्र आकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे. तेथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. पश्चिम महाराष्ट्रातील इतर शहरातही तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे गारवा कमी जाणवत आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांतही तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये निरभ्र आकाश असणार आहे. तेथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. उत्तर महाराष्ट्रातील तापमानात बहुतांश घट झाली होती. त्यामुळे गारवा जाणवत होता. मात्र, आता तापमानात वाढ झाल्याने थंडी पूर्णतः ओसरली आहे.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूरमध्ये दुपार किंवा सायंकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. विदर्भातील तापमानात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे.
advertisement
7/7
राज्यातील तापमानात वाढ झाल्याने गारवा कमी झालाय. तसेच तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण देखील बघायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. वातावरणात अचानक बदल झाल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alret : महाराष्ट्रावर आता धुळीचं संकट, वातावरणही बिघडलं, हवामान खात्याने दिला अलर्ट