TRENDING:

Weather Alert : पुढील 24 तास धोक्याचे, महाराष्ट्रात थंडीची लाट कायम, हवामान खात्याकडून अलर्ट

Last Updated:
21 नोव्हेंबर रोजी देखील राज्यात वातावरणात गारवा कायम असणार आहे. उत्तर भारतातून येणारा वाऱ्यांचा प्रवाह राज्यात हुडहुडी वाढवतोय. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यातील तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
1/7
पुढील 24 तास धोक्याचे, महाराष्ट्रात थंडीची लाट कायम, हवामान खात्याकडून अलर्ट
21 नोव्हेंबर रोजी देखील राज्यात वातावरणात गारवा कायम असणार आहे. उत्तर भारतातून येणारा वाऱ्यांचा प्रवाह राज्यात हुडहुडी वाढवतोय. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यातील तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
2/7
राज्यातील पुणे, नाशिक, जळगाव या प्रमुख शहरात गेले काही दिवस एक अंकी तापमान नोंदवले गेले होते. आता त्यात 1 ते 2 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे. पाहुयात 21 नोव्हेंबर रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
3/7
राज्यातील इतर शहरांत तापमानात घट होत आहे. पण, मुंबईत मात्र अजूनही तापमानात पाहिजे तशी घट झालेली नाही. 21 नोव्हेंबर रोजी मुंबईत किमान तापमान 22 तर कमाल तापमान 34 अंश सेल्सियस एवढं राहील.
advertisement
4/7
पश्चिम महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका कायम आहे. पुण्यात 20 नोव्हेंबर रोजी 11 अंश सेल्सियस एवढं तापमान नोंदवलं गेलं. तर 21 नोव्हेंबर रोजी पुण्यात 12 अंश सेल्सियस एवढं किमान तापमान पहायला मिळेल. पुण्यातील तापमानात 2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये 20 अंश सेल्सियस तापमान राहण्याची शक्यता आहे. तापमानात सर्वाधिक घट ही उत्तर महाराष्ट्रात बघायला मिळाली.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये 12 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. 21 तारखेला 13 अंश तापमान राहील. उत्तर महाराष्ट्रातील तापमानातही 1 ते 2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. जळगावमध्येही पारा घसरलेलाच पहायला मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये 21 नोव्हेंबर रोजी निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. मराठवाड्यातील तापमानात देखील 2 अंशांनी वाढ झाली आहे. तरीही वातावरणात गारवा कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे. तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत तापमानात किंचित वाढ दिसून येत आहे. सकाळी आणि सायंकाळी गारवा तसेच काही भागांत दुपारी उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : पुढील 24 तास धोक्याचे, महाराष्ट्रात थंडीची लाट कायम, हवामान खात्याकडून अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल