Thar ची फक्त चाकं उरली, 2 दिवस चौघांचे मृतदेह ताम्हिणी घाटातच होते पडलेले, गाडीचे PHOTOS समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
थार कार घेऊन सहा मित्रांनी पुण्यातून कोकणात जाण्याचा प्लॅन केला होताा. ताम्हिणी घाटातून जात असताना एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि थार कार थेट 500 फूट खोल दरीत कोसळली. (मोहन जाधव, प्रतिनिधी)
advertisement
1/10

रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटामध्ये एका अपघातामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पुण्यातून कोकणात निघालेल्या मित्रांची महिंद्रा थार 500 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात गाडीतील ६ जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, 20 दिवसांपूर्वीच ही थार खरेदी करण्यात आली होती. तब्बल २ दिवस त्यांचे मृतदेह हे दरीत पडलेले होते. जेव्हा ड्रोनच्या मदतीने शोध घेतला तेव्हा गाडी आढळली.
advertisement
2/10
रायगड जिल्ह्यातल्या ताम्हिणी घाटात महिंद्रा थार कार 500 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना २० नोव्हेंबरला समोर आली. या अपघातात आतापर्यंत चौघांचा मृतदेह रेस्क्यू टीमच्या हाती लागले असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. या कारमध्ये सहा जण होते.
advertisement
3/10
अवघ्या 20 दिवसांपूर्वी नवीन कोरी थार कार घेऊन हे तरुण पुण्यातून कोकणात फिरण्यासाठी जात होते. मात्र, ताम्हिणी घाटातील एका वळणार त्याचं नियंत्रण सुटलं आणि थेट 500 फूट खोल दरीत ही कार कोसळली असल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
4/10
मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील मृत हे सगळे पुण्यातील रहिवासी होते. २० दिवसांपूर्वीच महिंद्रा थार खरेदी केली होती. थार कार घेऊन सहा मित्रांनी पुण्यातून कोकणात जाण्याचा प्लॅन केला होताा. ताम्हिणी घाटातून जात असताना एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि थार कार थेट 500 फूट खोल दरीत कोसळली.
advertisement
5/10
गाडीला अपघात हा १८ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडला होता. 18 तारखेला पहाटे पुण्यातून कोकणाला निघाले होते. तर येतानाच त्यांचा इथं अपघात झाला. पुण्यातील कोपरे उत्तमनगरला राहणारे होते. सगळे २०, २१ आणि २५ वयोगटातील होते.
advertisement
6/10
त्यांच्या घरचे संपर्क साधत होते. मुलं पोहोचली काही म्हणून चौकशी करत होते. त्यांचा तीन दिवस राहण्याचा प्लॅन होता. पण, फोन केल्यावर कुणीच उचलत नव्हते. घरच्यांनी वाट पाहिली की परत फोन येईल. पण फोन आलाच नाही.
advertisement
7/10
मग त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार केली. लोकेशन शोधून काढलं तेव्हा आम्ही इथं पोहोचलो. पण, त्यावेळी इथं कुणीच दिसलं नाही. जेव्हा ड्रोनच्या मदतीने तपासलं तेव्हा गाडीचा तुकडा आढळला.
advertisement
8/10
त्यानंतर रेस्क्युची टीम आली आणि त्यांनी शोध लावला, अशी माहिती मृतांच्या नातेवाईकांनी दिली.
advertisement
9/10
अपघात स्थळावर फॉरेन्सिक टीम दाखल- दरम्यान, ताम्हिणी घाटातील एका मुख्य वळणावर एक थार कार वेगात येवून 500 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आल्यानंतर ताम्हिणी घाटातील या अपघातग्रस्त स्थळी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे. अपघाताचे मूळ कारण आणि अपघात स्थळावरून हवेत गेलेली थार 500 फूट खोल दरीत किती वेगात कोसळली, असावी याचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीमचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले आहे.
advertisement
10/10
कोसळलेल्या थार कारचा वेग इतका होता की, घाटावर लावण्यात आलेले लोखंडी बेरिगेट्स तुटलाा होता. लोखंडी पोलचे तुकडे घटनास्थळावर पडले आहे. त्यामुळे या कारचा वेग प्रचंड वेगात असावा, असा अंदाज व्यक्त होतोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Thar ची फक्त चाकं उरली, 2 दिवस चौघांचे मृतदेह ताम्हिणी घाटातच होते पडलेले, गाडीचे PHOTOS समोर