Kitchen Tip : फ्रिजमध्ये ब्रेडसोबत टिश्यू पेपर का ठेवतात? कारण ऐकून म्हणाल, 'हे कोणी आधी का सांगितलं नाही'
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पण फ्रिजमध्ये ब्रेड ठेवल्यानंतरही एक समस्या कायम राहायची ब्रेडवर लवकर बुरशी यायची, अनेकदा अख्खं पॅकेट फेकून देण्याची वेळ यायची. यामुळे फक्त ब्रेड बनवण्याचा मूडच खराब होत नव्हता, तर पैशांची आणि अन्नाची नासाडी होत आहे म्हणून तिला खूप वाईट वाटायचे.
advertisement
1/10

सायलीला वेगवेगळे पदार्थ बनवायला आणि घरच्यांना प्रेमाने खाऊ घालायला खूप आवडते. तिच्या मेन्यूमध्ये अनेकदा ब्रेडने बनवलेले स्नॅक्स असायचे. त्यामुळे ब्रेड हा तिच्या घरातला 'कंपलसरी' जिन्नस होता. बऱ्याच महिलांसारखी सायलीही फ्रिजमध्ये ब्रेडचे मोठे पॅकेट आणून ठेवायची, कारण फ्रिजमध्ये ठेवल्याने पदार्थ जास्त टिकतात, असा तिचा समज होता.
advertisement
2/10
पण फ्रिजमध्ये ब्रेड ठेवल्यानंतरही एक समस्या कायम राहायची ब्रेडवर लवकर बुरशी यायची, अनेकदा अख्खं पॅकेट फेकून देण्याची वेळ यायची. यामुळे फक्त ब्रेड बनवण्याचा मूडच खराब होत नव्हता, तर पैशांची आणि अन्नाची नासाडी होत आहे म्हणून तिला खूप वाईट वाटायचे.
advertisement
3/10
गावावरून आलेल्या सासूबाईंनी दिली 'गुरुकिल्ली'एक दिवस सायलीची सासूबाई गावाहून तिच्याकडे राहायला आल्या होत्या. सायली बुरशी आलेला ब्रेड फेकून देत असताना सासूबाईंनी पाहिले आणि सायलीला विचारले, "अगं, रोज रोज ब्रेड का फेकत असतेस?"
advertisement
4/10
सायलीने आपली समस्या सांगितल्यावर सासूबाई हसल्या आणि म्हणाल्या, "अगं, यासाठी इतका विचार करायचा? मी तुला एक साधा आणि खर्च वाचवणारा 'देसी जुगाड' सांगते. त्यानंतर तुझा ब्रेड कधीच खराब होणार नाही आणि त्याला बुरशीही पकडणार नाही."
advertisement
5/10
सासूबाईंनी सांगितलेला उपाय सायलीने लगेच करून पाहिला आणि खरंच, तिचा ब्रेड पूर्वीपेक्षा जास्त काळ फ्रेश राहिला, तेव्हापासून सायलीने तिच्यासारख्याच मैत्रिणींसोबत हा जुगाड शेअर केला आहे.
advertisement
6/10
हा आहे तो 'जादुई' देसी जुगाड:तुमच्या ब्रेडच्या पॅकेटमध्ये एक किंवा दोन टिश्यू पेपर ठेवून ते पॅकेट फ्रिजमध्ये ठेवा. तुम्ही विचार करत असाल की टिश्यू पेपर काय काम करणार? तर यामागे एक छोटासा घरगुती 'सायन्स' आहे.
advertisement
7/10
टिश्यू पेपरमुळे ब्रेड जास्त का टिकतो?ब्रेडमध्ये नैसर्गिकरीत्या ओलावा असतो. जेव्हा आपण ब्रेड फ्रिजमध्ये ठेवतो, तेव्हा तापमान कमी झाल्यामुळे हा ओलावा वाफ बनून पुन्हा पॅकेटमध्ये जमा होतो. हाच अतिरिक्त जमा झालेला ओलावा बुरशीला वाढण्यासाठी पोषक वातावरण देतो आणि ब्रेड लवकर खराब होतो.
advertisement
8/10
पण जेव्हा तुम्ही पॅकेटमध्ये टिश्यू पेपर ठेवता, तेव्हा हा टिश्यू पॅकेटमध्ये तयार होणारा जास्तीचा ओलावा शोषून घेतो. त्यामुळे ब्रेडवर बुरशी येण्यासाठी लागणारे दमट वातावरण (Moisture) तयार होत नाही.
advertisement
9/10
म्हणजे, टिश्यू पेपरमुळे ब्रेड फक्त थंडीने कोरडा होत नाही आणि जास्त ओलावा राहूनही खराब होत नाही. यामुळे तुमच्या ब्रेडचे शेल्फ-लाईफ (Shelf-life) आपोआप २ ते ४ दिवसांनी वाढते. सायलीच्या सासूबाईंनी सांगितलेला हा साधा उपाय तिच्यासाठी गेमचेंजर ठरला.
advertisement
10/10
लक्षात ठेवा हा उपाय करताना टिश्यू पेपरची क्वालिटी चांगली असावी, कारण स्वस्त टिश्यू ओलावा शोषल्यावर लगेच फाटतो आणि मग तो ब्रेडला चिकटण्याचा धोका ही वाढतो. तुम्हीही सायलीसारख्या ब्रेड खराब होण्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर लगेच हा साधा उपाय करून पाहा आणि तुमचा अनुभव आम्हाला नक्की सांगा
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tip : फ्रिजमध्ये ब्रेडसोबत टिश्यू पेपर का ठेवतात? कारण ऐकून म्हणाल, 'हे कोणी आधी का सांगितलं नाही'