TRENDING:

Farah Khan Wedding: शाहरुख-गौरीने का केलं होतं फराह खानचं कन्यादान? ट्रोलरच्या प्रश्नावर दिग्दर्शिकेचं सडेतोड उत्तर

Last Updated:
Farah Khan Wedding: २००४ मध्ये फराहने एडिटर शिरीष कुंदर यांच्याशी लग्न केले. नुकतंच त्यांच्या लग्नातील एक खास क्षण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, तो म्हणजे, शाहरुख खान आणि गौरी खान यांनी फराहचे केलेले कन्यादान!
advertisement
1/9
शाहरुख-गौरीने का केलं होतं फराह खानचं कन्यादान?ट्रोलरच्या प्रश्नावर सडेतोड उत्तर
मुंबई: बॉलिवूड दिग्दर्शक फराह खान आणि सुपरस्टार शाहरुख खान यांचे नाते केवळ मैत्रीचे नसून, ते कुटुंबासारखे आहे. २००४ मध्ये फराहने एडिटर शिरीष कुंदर यांच्याशी लग्न केले.
advertisement
2/9
नुकतंच त्यांच्या लग्नातील एक खास क्षण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, तो म्हणजे, शाहरुख खान आणि गौरी खान यांनी फराहचे केलेले कन्यादान!
advertisement
3/9
सिमी गरेवाल यांच्या शोमधील हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका युजरने 'कन्यादान कशासाठी?' असा प्रश्न उपस्थित करत टीका केली होती. यावर फराह खानने थेट उत्तर देऊन त्या प्रथेबद्दलचा गैरसमज दूर केला.
advertisement
4/9
फराह खानच्या लग्नात भाऊ आणि आई हयात असताना शाहरुख-गौरीने कन्यादान का केले, यावर टीका करणाऱ्या युजरला फराहने स्पष्टीकरण दिले.
advertisement
5/9
फराह खानने त्या कमेंटवर प्रतिक्रिया देत म्हटले, "मंगळूरूमध्ये केवळ एक विवाहित जोडपेच कन्यादान करू शकते... त्यामुळे कृपा करून काहीही बोलण्यापूर्वी काळजी घ्या."
advertisement
6/9
मंगळूरू भागातील प्रथेनुसार, अविवाहित किंवा एकट्या व्यक्तीऐवजी, विवाहित जोडपे वधूचे कन्यादान करू शकतात, त्यामुळे शाहरुख आणि गौरीने ही जबाबदारी पार पाडली.
advertisement
7/9
फराह खानने सिमी गरेवाल यांच्या शोमध्ये गौरीला शिरीषबद्दल सर्वात आधी कसे कळले, याचा किस्साही सांगितला होता. "शिरीष आणि मी एडिटिंग रूममध्ये एका प्रोमोवर काम करत होतो. गौरी तिथे आली आणि तिने आम्हा दोघांना पाहिले. नंतर तिने मला फोन केला आणि म्हणाली, 'तू माझ्याशी खोटं बोललीस. तुम्ही दोघे एकमेकांना डेट करत आहात, हे मला कळतंय.'"
advertisement
8/9
फराहने कबूल केले की, क्रू मेंबर्सना कळू नये म्हणून आम्ही लपवत होतो. गौरीचा अंदाज बरोबर होता. शाहरुखने नंतर फोन केला नाही, पण 'मैं हूँ ना' च्या सक्सेस पार्टीत फराहने शिरीषची ओळख सगळ्यांशी करून दिली.
advertisement
9/9
शाहरुख खानने फराहने डायरेक्ट केलेल्या 'मैं हूं ना', 'ओम शांति ओम' आणि 'हॅप्पी न्यू ईयर' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
Farah Khan Wedding: शाहरुख-गौरीने का केलं होतं फराह खानचं कन्यादान? ट्रोलरच्या प्रश्नावर दिग्दर्शिकेचं सडेतोड उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल