TRENDING:

Mahindra Thar दिसायला टँकसारखी दणकट, मग, ताम्हिणी घाटात चक्काचूर कशी झाली? 6 जणांचा जीव जाणाऱ्या Thar ला किती सेफ्टी रेटिंग?

Last Updated:
मुळात महिंद्रा थार ही एक धाकड आणि दणकट अशी एसयूव्ही आहे. तरुणांमध्ये महिंद्रा थारची तर चांगलीच क्रेझ आहे. आपल्या दारातही थार असावी असं प्रत्येक जण स्वप्न पाहत असतो. पुण्यातील तरुणाने आपल्या स्वप्नातली थार नुकतीच विकत घेतली होती. पण
advertisement
1/11
Mahindra Thar ताम्हिणी घाटात चक्काचूर कशी झाली? Thar ला किती सेफ्टी रेटिंग?
भारतात सध्या कार असो अथवा एसयूव्ही खरेदी करताना सेफ्टी रेटिंग जास्त भर दिला आहे. टाटा आणि महिंद्राच्या गाड्यांनी सेफ्टी रेटिंगमध्ये नेहमी ४ नाहीतर ५ स्टार रेटिंग मिळवले आहे. अशातच रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटामध्ये एका महिंद्रा थार गाडीचा अपघात झाला. नवी कोरी महिंद्रा थार ५०० फूट दरीत कोसळली. या अपघातात पुण्यातील ६ जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर महिंद्रा थारच्या सेफ्टीबद्दल चर्चा केली जात आहे.
advertisement
2/11
मुळात महिंद्रा थार ही एक धाकड आणि दणकट अशी एसयूव्ही आहे. तरुणांमध्ये महिंद्रा थारची तर चांगलीच क्रेझ आहे. आपल्या दारातही थार असावी असं प्रत्येक जण स्वप्न पाहत असतो. पुण्यातील तरुणाने आपल्या स्वप्नातली थार नुकतीच विकत घेतली होती. पण, नियतीच्या मनात काही वेगळं होतं.  पुण्यातून कोकणात निघालेल्या मित्रांची महिंद्रा थार 500 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात गाडीतील ६ जणांचा मृत्यू झाला. तब्बल २ दिवस त्यांचे मृतदेह हे दरीत पडलेले होते.
advertisement
3/11
Mahindra Thar बद्दल बोलायचं झालं तर तिने सेफ्टी रेटिंगमध्ये ४ स्टार मिळाले होते.  Mahindra Thar 2020 मध्ये लाँच झाली होती. ३-डोअर मॉडेलला ग्लोबल NCAP  क्रॅश टेस्टमध्ये ४-स्टार रेटिंग मिळाले होते.
advertisement
4/11
Mahindra Thar ला प्रौढ व्यक्तींची सुरक्षेमध्ये ४ स्टार रेटिंग मिळाले होते. तेव्हा या  मॉडेलमध्ये २ एअरबॅग्ज होत्या.
advertisement
5/11
Mahindra Thar ला ग्लोबल NCAP  क्रॅश टेस्टमध्ये ४-स्टार रेटिंग मिळाले होते. त्यामुळे ही एसयूव्ही एक सेफ्टी एसयूव्ही म्हणून ओळखली जातेय.
advertisement
6/11
एवढंच नाहीतर महिंद्राने अलीकडे नवीन Thar ROXX हे मॉडेल लाँच केलं. हे एक ५ डोअर मॉडेल आहे. या   महिंद्रा Thar ROXX ला भारत NCAP आणि (BNCAP) क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाले होते.
advertisement
7/11
ही टेस्ट २०२४ मध्ये घेण्यात आली होती.  प्रौढ व्यक्तींची सुरक्षेत ३२ पैकी ३१.०९ गूण मिळाले होते. तर लहान मुलांच्या सुरक्षेत  ४९ पैकी ४५.०० गूण मिळवत ५ स्टार रेटिंग मिळाले होते.
advertisement
8/11
Thar ROXX मध्ये सुरक्षा फीचर्स स्टँडर्ड  दिले आहे.  यात ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि प्रवाशांसाठी ३-पॉईंट सीटबेल्ट दिले आहे.
advertisement
9/11
पण, प्रत्येक वेळी अपघात आणि क्रेश टेस्टची परिस्थिती वेगळी असते. ताम्हिणी घाटात झालेल्या थारचा भीषण अपघात झाला होता. ताम्हिणी घाटातील एका मुख्य वळणावर Mahindra Thar वेगात होती. घाटात लावलेले बॅरिकेट्स तोडून  Mahindra Thar ही 500 फूट खोल दरीत कोसळली होती.
advertisement
10/11
इतक्या उंचावरून Mahindra Thar कोसळल्यामुळे गाडीचा चेंदामेंदा झाला. Mahindra Thar चे छत हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. तर Mahindra Thar चे चाकं आणि चेसी ही फक्त उरली होती. या अपघातात कुणाचीही वाचण्याची शक्यता ही कमीच होती.
advertisement
11/11
ज्या ठिकाणी म्हणजे, ताम्हिणी घाटातील या अपघातस्थळी फॉरेन्सिक टीम पोहोचली. त्यांनी घटनेची पाहणी केली. अपघाताचे मूळ कारण आणि अपघात स्थळावरून हवेत गेलेली थार 500 फूट खोल दरीत किती वेगात कोसळली, असावी याचा तपास फॉरेन्सिक टीमचे अधिकारी करत आहे. त्यांच्या अहवालानंतर खरं कार समोर येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Mahindra Thar दिसायला टँकसारखी दणकट, मग, ताम्हिणी घाटात चक्काचूर कशी झाली? 6 जणांचा जीव जाणाऱ्या Thar ला किती सेफ्टी रेटिंग?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल