TRENDING:

कुठे गाडी उलटी धावली तर कुठे ठोकली, घातवार ठरला शनिवार! मुंबई-पुण्यात एकाच दिवशी 3 'विचित्र' अपघात PHOTO

Last Updated:
शनिवार घातवार ठरला आहे. मुंबई पुणे जुना हायवे, वारजेमधील उड्डाणपूल आणि लोणावळा अशा तीन ठिकाणी भीषण अपघात झाला. कुठे गाडी ठोकली तर कुठे गाडी अचानक मागे आली, या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आणि वाहतूक कोंडी देखील झाली होती. घटनास्थळावरचे फोटो समोर आले आहेत.
advertisement
1/5
कुठे गाडी उलटी धावली तर कुठे ठोकली, घातवार ठरला शनिवार! मुंबई-पुण्यात 3 अपघात
मुंबई पुणे जुन्या हायवेवर मिल ठाकूरवाडी जवळ तीव्र उतारावर टेम्पो पिकअप आणि कार यांच्यात धडक झाली असून या धडकेत टेम्पो चालक गंभीर जखमी झाला आहे.टेम्पो चालक धनंजय बोहे अस टेम्पो चालकाचे नाव असून तो माळशेज येथील रहिवासी असल्याचे समजते त्याला खोपोली येथील हॉस्पिटल अधिक उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारण अस्पष्ट आहे.
advertisement
2/5
वारजे मधील उड्डाणपुलावर ट्रक अचानक उलटा धावला आणि रिक्षाला धडकला. वारजे माळवाडी मधून गेलेल्या मुंबई बेंगलोर महामार्गावर अचानक एक विचित्र अपघात घडला आणि त्यात सुदैवाने चार जण बचावले. काल रात्री घडली अपघाताची घटना घडली. साताऱ्यातून चाकणकडे साहित्य घेऊन चाललेला ट्रक वारजे मधून चांदणी चौकाच्या दिशेने जात असताना माई मंगेशकर रुग्णालयाच्या पुलावर चढता चढता मागे आला.
advertisement
3/5
यावेळी त्यामागे एक रिक्षा जात होती. सुदैवाने रिक्षाचालकाने पटकन ब्रेक दाबून रिक्षा थांबवली. मात्र तो ट्रक रिक्षावर आदळला यावेळी रिक्षाचालकाने ब्रेक दाबून धरत मागून येणाऱ्या इतर वाहनांना सावध केले. ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याला उभे देखील राहता येत नव्हते की बोलता देखील येत नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
advertisement
4/5
गोवा येथून पर्यटनासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा अपघातात दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी लोणावळा येथे घडली लोणावळ्या हुन सहारा सिटी कडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवलिंग पॉईंट येथे भरधाव स्विफ्ट कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ने समोरून येणाऱ्या डंपरला जोरदार धडक दिली कारचा वेग अनियंत्रित असल्याने धडक एवढी भीषण होती की स्वीफ्ट कारचा दर्शनीभाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे
advertisement
5/5
या अपघातात कारचालक योगेश सुतार वय 21 राहणार म्हापसा गोवा तसेच त्याच्यासोबत असलेला मयूर वेंगुळकर वय 24 राहणार म्हापसा गोवा यांना गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्त्राव झाल्याने दोघांचा अपघातात मृत्यू झाला
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
कुठे गाडी उलटी धावली तर कुठे ठोकली, घातवार ठरला शनिवार! मुंबई-पुण्यात एकाच दिवशी 3 'विचित्र' अपघात PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल