'म्हणून मी तिच्याबरोबर...' उर्मिला मातोंडकरसोबत अफेअर्सच्या चर्चा, राम गोपाल वर्माने अनेक वर्षांनी मौन सोडलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बॉलिवूड निर्माते राम गोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकर यांचं अफेअर असल्याच्या अनेक चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहेत. अखेर अनेक वर्षांनी राम गोपाल वर्मा यांनी यावर मौन सोडलं आहे.
advertisement
1/7

राम गोपाल वर्मा हे त्यांच्या चित्रपटांसाठी आणि त्यांच्या रंगेल स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. तरुण अभिनेत्रींसोबत राम गोपल वर्माचे अनेक अफेअर्स चर्चेत आलेत. त्यातील किती सत्य आण किती अफवा हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडतो. त्याचं एका अभिनेत्रीसोबतचं अफेअर चांगलंच गाजलं होतं. ती अभिनेत्री म्हणजेच 90 चं दशक गाजवणारी उर्मिला मातोंडकर.
advertisement
2/7
राम गोपाल वर्मा आणि उर्मिला यांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केलं. दोघांचं अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. उर्मिलामुळे राम गोपाल वर्माचा डिवोर्स झाल्याच्याही चर्चा होत्या. पण दोघांनीही कधीच यावर भाष्य केलं नाही. उर्मिलासोबतच्या नात्यावर राम गोपाल वर्मा यांनी अनेक वर्षांनी मौन सोडलं आहे.
advertisement
3/7
चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांच्या आयुष्यातील वादांचा इतिहास फार मोठा आहे आणि त्यांनी तो कधीच टाळण्याचा प्रयत्न केला नाही. झूमला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला मातोंडकरसोबतच्या त्यांच्या अफेअरबद्दलच्या चर्चांवर भाष्य केलं.
advertisement
4/7
राम गोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकर यांनी 'रंगीला', 'सत्या' आणि 'प्यार तूने क्या किया' सारख्या सिनेमात एकत्र काम केलं. उर्मिलाला पहिला सिनेमा देणारे देखील राम गोपाल वर्माच होते. रंगीला या डेब्यू सिनेमातून उर्मिला घराघरात पोहोचली. राम गोपाल वर्मांच्या सिनेमांमुळेच उर्मिला मातोंडकरला स्टार अभिनेत्री बनली.
advertisement
5/7
राम गोपाल वर्मा यांनी झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला मातोंडकरसोबतच्या अफेअरच्या अफवांचं खंडन केलं. राम गोपाल वर्मा म्हणाले, "मला वाटते की उर्मिला ही खूप वर्सटाइल अभिनेत्री आहे. म्हणूनच मी तिच्यासोबत इतक्या सिनेमांमध्ये काम केले आहे. मी अमिताभ बच्चनसोबतही खूप काम केलं आहे. पण त्यांच्याबद्दल कोणीही बोलत नाही."
advertisement
6/7
राम गोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकर सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी असताना त्यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या 'गन्स अँड थाइज: द स्टोरी ऑफ माय लाइफ' या पुस्तकात मेरी जिंदगी की औरते या सेक्शनमध्ये उर्मिलाविषयी लिहिलं आहे.
advertisement
7/7
ते उर्मिलावर फिदा होते हे त्यांनी कोणतेही आढेवढे न घेता मान्य केलं आहे. 'उर्मिला माझ्या आयुष्यातील अशी स्त्री होती जिचा माझ्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला', असं त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'म्हणून मी तिच्याबरोबर...' उर्मिला मातोंडकरसोबत अफेअर्सच्या चर्चा, राम गोपाल वर्माने अनेक वर्षांनी मौन सोडलं