My Heart Goes Out to You… सक्षम ताटेसाठी भावुक झाला बॉलिवूडचा 'परश्या', अवॉर्ड केला डेडिकेट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
नांदेडचं सक्षम ताटे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीनं या प्रकरणी भावुक पोस्ट लिहिली आहे. त्याने त्याला मिळालेला अवॉर्डही त्याला डेडिकेट केला आहे.
advertisement
1/7

नांदेडच्या इतवारा परिसरात 20 वर्षीय सक्षम ताटे आणि आचल मामीडवार यांचं प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे. जातीय भेदामुळे आचलच्या कुटुंबीयांनी सक्षमची हत्या केली. या घटनेनं संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं. सक्षम ताटेला न्याय मिळावा अशी मागणी आचलने केली आहे.
advertisement
2/7
नांदेडमधील हे प्रकरण समजल्यानंतर बॉलिवूडचा परश्या म्हणजेच अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी देखील भावुक झाला. त्याने सक्षम ताटेसाठी खास पोस्ट लिहिली आहे. इतकंच नाही तर त्याला मिळालेला अवॉर्ड त्याने सक्षम ताटेला डेडिकेट केला आहे.
advertisement
3/7
'धडक' आणि 'धडक 2' या सिनेमातून सिद्धांत चतुर्वेदी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. धडक हा सैराट या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक होता. पहिल्या सिनेमाच्या यशानंतर 'धडक 2' ही रिलीज करण्यात आला. 'धडक 2' मध्ये सिद्धांतने साकारलेल्या निलेशच्या भूमिकेचं प्रेक्षक आणि समीक्षकांनी कौतुक केलं.
advertisement
4/7
सिद्धांतचं 'धडक 2' सिनेमासाठी पॉवर पॅक्ड परफॉर्मर ऑफ द इयर अवॉर्ड सन्मानित करण्यात आलं. हा अवॉर्ड सिद्धांतने नांदेडमध्ये प्रेमप्रकरण आणि जातीय वादातून बळी ठरलेल्या दिवंगत सक्षम ताटेला डेडिकेट केला. सक्षम ताटेला श्रद्धांजली अर्पण करत इमोशनल पोस्ट लिहिली.
advertisement
5/7
सिद्धांतने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "हा पुरस्कार फक्त माझा नाही. जात किंवा समाजाच्या अन्यायामुळे ज्यांना बहिष्कृत केलं गेलं, भेदभाव सहन करावा लागला अशा प्रत्येकाच्या जिद्दीचा हा सन्मान आहे."
advertisement
6/7
"परिस्थिती प्रतिकूल असली तरी त्यांनी उभं राहण्याचा, संघर्ष करण्याचा आणि अस्तित्व टिकवण्याचा अधिकार मिळवला. त्यांची ही जिद्द मला सलाम करायला लावते. त्यामुळे हा पुरस्कार मी दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करतो. त्याचं कुटुंब, त्यांचा गाव आणि मीही त्याच्यामागे मनापासून उभा आहे."
advertisement
7/7
अभिनेता सिद्धांतच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झाल्यास, त्याचा 'दो दीवाने शहर में' हा सिनेमा 20 फेब्रुवारी 2026 ला रिलीज होतोय. त्याचबरोबर चित्रपती व्ही.शांताराम यांच्या बायोपिकमध्येही तो प्रमुख भूमिकेत आहे. हा सिनेमा देखील 2026 मध्ये रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
My Heart Goes Out to You… सक्षम ताटेसाठी भावुक झाला बॉलिवूडचा 'परश्या', अवॉर्ड केला डेडिकेट