"मला सवत आणलीस, आता बाबा...", ऐन लग्नात शिवाली परबचा निमिषला सवाल, म्हणाली...
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Shivali Parab on Nimish Kulkarni Wedding : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी नुकताच कोमल भास्करसोबत विवाहबंधनात अडकले आहेत. दरम्यान शिवाली परबने ऐन लग्नात निमिष कुलकर्णीला टोमणा मारला आहे.
advertisement
1/7

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी 5 डिसेंबर 2025 रोजी कोमल भास्करसोबत विवाहबंधनात अडकला आहे. निमिषच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
2/7
निमिष कुलकर्णीच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटी मंडळीसह, महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील कलाकारांनीही हजेरी लावली. दरम्यान शिवाली परबदेखील उपस्थित होती. निमिष कुलकर्णी आणि शिवाली परबच्या डेटिंगच्या चर्चा याआधी सोशल मीडियावर रंगल्या आहेत. पण दोघांकडूनही या अफवा असल्याचं अनेकदा सांगण्यात आलं आहे.
advertisement
3/7
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील एका स्किटमधील 'शिवाली हे खरंय' हे वाक्य प्रचंड गाजलं. या स्किटमध्ये शिवाली आणि निमिष एकमेकांचे पती-पत्नी दाखवण्यात आले होते. तर समीर चौघुले शिवालीच्या वडिलांच्या भूमिकेत होते. प्रेक्षकांना शिवाली आणि निमिष यांची जोडी आवडायची.
advertisement
4/7
शिवाली परबचा निमिषच्या लग्नातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिवाली निमिषला टोमणा मारत म्हणतेय,"शेवटी मला सवत आणलीस... आता माझे बाबा येतील बघ कसे तुझ्याशी भांडायला".
advertisement
5/7
शिवाली परबने निमिष आणि कोमल यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांना नव्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो शेअर करत तिने कॅप्शन लिहिलं आहे,"निमिष हे खरं आहे... अभिनंदन".
advertisement
6/7
निमिष कुलकर्णी आणि शिवाली परब गेल्या नऊ-दहा वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. कॉलेजमध्ये असल्यापासून ते एकमेकांना ओळखतात. पण त्यांची फक्त चांगली मैत्री आहे. दोघांनी कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धा करत आपल्या अभिनयप्रवासाची सुरुवात केली आहे.
advertisement
7/7
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून निमिष कुलकर्णी आणि शिवाली परब घराघरांत पोहोचले आहेत. हास्यजत्रेने शिवालीला लवली ही नवी ओळख मिळवून दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
"मला सवत आणलीस, आता बाबा...", ऐन लग्नात शिवाली परबचा निमिषला सवाल, म्हणाली...