TRENDING:

Team India : 'अनलकी' कॉमेंटेटर बाहेर गेला अन् नशीब पलटलं, 752 दिवसांनी टीम इंडियाला गूड न्यूज मिळाली!

Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 9 विकेटने दणदणीत विजय झाला. या विजयासोबतच भारताने 3 वनडे मॅचची ही सीरिज 2-1 ने जिंकली आहे.
advertisement
1/6
कॅप्टन नाही कॉमेंटेटरच होता 'अनलकी', 752 दिवसांनी टीम इंडियाला मिळाली गूड न्यूज!
दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 270 रनचं आव्हान भारताने 39.5 ओव्हरमध्येच पार केलं. यशस्वी जयस्वालने 121 बॉलमध्ये नाबाद 116 रन केले तर रोहित शर्माने 75 आणि विराट कोहलीने नाबाद 65 रनची खेळी केली.
advertisement
2/6
विशाखापट्टणममध्ये झालेल्या या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. वनडेमध्ये तब्बल 20 टॉस गमावल्यानंतर भारतीय कर्णधाराला टॉस जिंकता आला.
advertisement
3/6
वनडे क्रिकेटमध्ये भारताने शेवटचा टॉस 2023 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध जिंकला होता. 15 नोव्हेंबर 2023 नंतर 752 दिवसांनी टीम इंडियाने 6 डिसेंबर 2025 ला वनडे क्रिकेटमध्ये टॉस जिंकला.
advertisement
4/6
टीम इंडियाला टॉस जिंकता येत नव्हता तेव्हा क्रिकेट चाहते कॅप्टनला दोष देत होते. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोन्ही कर्णधारांना या कालावधीमध्ये टॉस जिंकता आला नाही, पण तिसऱ्या वनडेमध्ये केएल राहुलने टॉस जिंकला.
advertisement
5/6
लागोपाठ 20 सामन्यांमध्ये टॉस गमावल्यानंतर 21 व्या वेळी टीम इंडियाने टॉस जिंकला तेव्हा चाहते कॉमेंटेटर रवी शास्त्री यांना ट्रोल करू लागले. विशाखापट्टणममध्ये रवी शास्त्री टॉससाठी मैदानात नव्हते.
advertisement
6/6
रवी शास्त्री यांच्याऐवजी मुरली कार्तिक टॉसला आले आणि टीम इंडियाचं नशीब बदललं. 20 टॉस हरल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार टॉस तर जिंकलाच, पण सामना जिंकून वनडे सीरिजवरही कब्जा केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : 'अनलकी' कॉमेंटेटर बाहेर गेला अन् नशीब पलटलं, 752 दिवसांनी टीम इंडियाला गूड न्यूज मिळाली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल