TRENDING:

'साई बाबा' फेम सुधीर दळवी यांची प्रकृती अजूनही चिंताजनक, 2 महिन्यांपासून रुग्णालयात दाखल

Last Updated:
Sudhir Dalvi : 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. गेल्या 2 महिन्यांपासून ते रुग्णालयात दाखल आहेत.
advertisement
1/7
सुधीर दळवी यांची प्रकृती अजूनही चिंताजनक, 2 महिन्यांपासून रुग्णालयात दाखल
'शिर्डी के साईं बाबा' फेम प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी गेल्या काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने चर्चेत आले होते. दोन महिन्यांपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. पण अजूनही त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
2/7
सुधीर दळवी 1977 मध्ये आलेल्या 'शिर्डी के साईं बाबा' या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचले. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. सुधीर दळवी सध्या 'सेप्सिस' या जीवघेण्या संसर्गाने ग्रस्त असून त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.
advertisement
3/7
सुधीर दळवी यांच्या मदतीसाठी आता शिर्डी साईबाबा ट्रस्ट पुढे आलं आहे. या ट्रस्टने सुधीव दळवी यांच्या उपचारासाठी 11 लाख रुपयांची मदत केली आहे.
advertisement
4/7
सुधीर दळवी गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना 8 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता उपचारामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडत चालली आहे. त्यामुळे काही काळापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांनी 15 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यानंतर प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांनी मदतीचा हात पुढे केला.
advertisement
5/7
सुधीर दळवी 1977 मध्ये आलेल्या 'शिर्डी के साईं बाबा' या प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील साईबाबांच्या भूमिकेसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. या चित्रपटात मनोज कुमार, हेमा मालिनी आणि राजेंद्र कुमार यांसारखे दिग्गज कलाकारही होते.
advertisement
6/7
सुधीर दळवी यांनी रामानंद सागर यांच्या 'रामायण' या पौराणिक मालिकेत महर्षी वशिष्ठ यांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिकादेखील लोकप्रिय झाली. सुधीर दळवी यांनी ‘भारत एक खोज’, ‘बुनियाद’, ‘चाणक्य’, ‘मिर्झा गालिब’ आणि ‘जुनून’ अशा मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले असले, तरी त्यांना खरी लोकप्रियता मिळवून दिली ती टेलिव्हिजनने.
advertisement
7/7
सुधीर दळवी यांना 8 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुधीर दळवी सध्या 86 वर्षांचे आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'साई बाबा' फेम सुधीर दळवी यांची प्रकृती अजूनही चिंताजनक, 2 महिन्यांपासून रुग्णालयात दाखल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल