TRENDING:

IND vs SA : 7 खेळाडूंना डच्चू, 10 जणांची एन्ट्री, T20 सीरिजसाठी टीम इंडियात मोठे बदल!

Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज 2-0 ने गमावल्यानंतर टीम इंडियाने वनडे सीरिजमध्ये 2-1 ने विजय मिळवला आहे. वनडे सीरिजनंतर आता दोन्ही टीममध्ये 5 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. या सीरिजसाठी भारतीय टीममध्ये बदल करण्यात आले आहेत.
advertisement
1/7
7 खेळाडूंना डच्चू, 10 जणांची एन्ट्री, T20 सीरिजसाठी टीम इंडियात मोठे बदल!
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली वनडे जिंकल्यानंतर टीम इंडियाचा दुसऱ्या सामन्यात पराभव झाला, त्यामुळे भारतीय टीमला तिसरा सामना जिंकणं गरजेचं होतं. जयस्वालचं शतक आणि रोहित शर्मा विराट कोहलीच्या अर्धशतकांमुळे भारताने तिसरी वनडे 9 विकेटने जिंकली.
advertisement
2/7
वनडे सीरिजमध्ये लागोपाठ 2 सामन्यांमध्ये शतकं आणि तिसऱ्या सामन्यात अर्धशतक करणाऱ्या विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
advertisement
3/7
वनडे सीरिज संपल्यानंतर आता दोन्ही टीममध्ये 5 टी-20 मॅचची सीरिज होईल. फेब्रुवारी महिन्यात भारतात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीकोनातून टी-20 सीरिज महत्त्वाची मानली जात आहे.
advertisement
4/7
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी वनडे सीरिज खेळलेल्या 6 खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे, तर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी आधीच टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे टी-20 सीरिजमध्ये वनडे खेळलेले 9 खेळाडू दिसणार नाहीत.
advertisement
5/7
टी-20 सीरिजसाठी ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, नितीश कुमार रेड्डी, केएल राहुल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल आणि प्रसिद्ध कृष्णा या 7 खेळाडूंची निवड करण्यात आलेली नाही. तर विराट, रोहित आणि जडेजा निवृत्ती घेतल्यामुळे टी-20 सीरिजमध्ये दिसणार नाहीत.
advertisement
6/7
टी-20 सीरिजसाठीच्या टीममध्ये 10 नव्या खेळाडूंची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. यामध्ये कर्णधार सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे.
advertisement
7/7
भारताची टी-20 टीम : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : 7 खेळाडूंना डच्चू, 10 जणांची एन्ट्री, T20 सीरिजसाठी टीम इंडियात मोठे बदल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल