Team India : कुणी सचिनचा विक्रम मोडतोय, तर कुणी आफ्रिदीचा, पण टीम इंडियाचा स्टार आगरकरलाच बाहेर काढणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 270 रनवर ऑलाऊट झाला आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव यांनी दक्षिण आफ्रिकेच्या 4-4 विकेट घेतल्या. सीरिजमध्ये विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे.
advertisement
1/6

सीरिजच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा तर दुसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला होता. सीरिजच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी विक्रमांना गवसणी घातली.
advertisement
2/6
विराट कोहलीने सीरिजच्या दोन्ही सामन्यांमध्ये शतकं झळकावली, याचसोबत विराटच्या वनडे क्रिकेटमधल्या शतकांची संख्या 53 झाली आहे. विराट हा वनडे क्रिकेटमधला सर्वाधिक शतकं खेळाडू ठरला आहे. 49 वनडे शतकांसह सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
advertisement
3/6
पहिल्या वनडेमध्ये 3 सिक्स मारून रोहित शर्माने विश्वविक्रम रचला. रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा खेळाडू ठरला. याआधी पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर हा विक्रम होता. आफ्रिदीने वनडे क्रिकेटमध्ये 351 सिक्स मारल्या आहेत.
advertisement
4/6
एकीकडे आफ्रिदी आणि सचिन तेंडुलकरचे विक्रम तुटत असतानाच टीम इंडियाचा आणखी एक स्टार अजित आगरकरचा विक्रम मोडण्याच्या जवळ पोहोचला आहे. अजित आगरकर हा सध्या टीम इंडियाच्या निवड समितीचा अध्यक्ष आहे.
advertisement
5/6
कुलदीप यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये 4 विकेट घेतल्या. वनडे क्रिकेटमध्ये कुलदीपने 11 वेळा एका इनिंगमध्ये 4 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. अजित आगरकरने त्याच्या करिअरमध्ये 12 वेळा हे रेकॉर्ड केलं आहे. आगरकरचं रेकॉर्ड मोडण्यासाठी कुलदीपला आणखी दोन वनडेमध्ये 4 पेक्षा जास्त विकेट घ्याव्या लागणार आहेत.
advertisement
6/6
भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा 4 पेक्षा जास्त विकेट घेण्याचा विक्रम मोहम्मद शमीच्या नावावर आहे. शमीने 16 वेळा 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. कुलदीपच्या नावावर वनडेमध्ये 191 विकेट आहेत. तर मोहम्मद शमीने वनडेमध्ये 206 आणि अजित आगरकरने 288 विकेट घेतल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : कुणी सचिनचा विक्रम मोडतोय, तर कुणी आफ्रिदीचा, पण टीम इंडियाचा स्टार आगरकरलाच बाहेर काढणार!