सोलापूर शहराच्या विकासाचा साक्षीदार असणारा 1922 मध्ये बांधण्यात आलेल्या पुलाला 103 वर्षे पूर्ण झाले आहेत. हा पूल धोकादायक बनल्याने हा पूल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम होणार आहे. या पुलाचे पाडकाम मंगळवारपासून सुरू होणार असल्याने या मार्गावरील वाहतूक एका वर्षासाठी बंद करण्यात आल्याने वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
advertisement
पाटलांच्या घरात होतेय बाबासाहेबांच्या प्रतिमेची पूजा, तिसरी पिढी जपतेय परंपरा, कारण आहे खास Video
मरीआई चौक ते एसटी स्टँडकडे जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मरीआई चौक, शेटे नगर, खमीतकर अपार्टमेंट, एम.एस.सी.बी. ऑफिस, निराळे वस्ती, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे एसटी स्टँडकडे जाता येणार आहे. तर मरीआई चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांना मरीआई चौक, नागोबा मंदिर, रामवाडी पोलीस चौकी, रामवाडी दवाखाना, रामवाडी ग्रीन गोडाऊन, मोदी बोगदा, जांबमुनी चौक, मोदी चौक, रेल्वे स्टेशन, सात रस्ताकडे जाता येणार आहे.
जडवाहतुकीसाठी असेल हा मार्ग
सोलापूर शहरातील भैय्या चौकात असलेला उड्डाणपूल रेल्वे मार्गाबरोबरच मंगळवेढा, पंढरपूर आणि कोल्हापूरसह अन्य शहरांना देखील जोडणारा पूल आहे. पूल पाडण्याच्या कालावधीत मंगळवेढा रोडकडून, हैदराबाद, तुळजापूर, विजयपूर-पुणे रोडकडे जाणाऱ्या वाहनांना विजापूर रोड ते केगाव बायपासचा वापर जड वाहतुकींसाठी करावा लागणार आहे. तसेच मंगळवेढाकडून येणाऱ्या जड वाहतुकीसाठी नवीन केगाव बायपास रोडचा वापर करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. तर वाहतूक पोलिसांचे शेटे नगर पूल, नागोबा मंदिर या ठिकाणी विशेष पॉईंटचे नियोजन करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी दिली.






