‘…म्हणून बाबासाहेबांच्या वस्तू मोठ्या अभिमानाने जपून ठेवल्या’, सोलापूरच्या गार्ड कुटुंबाची मनाला स्पर्श करणारी कहाणी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापुरात एका कामानिमित्त आले असताना त्यांचे आदरातिथ्य करण्याचा मान हणमंतु सायण्णा गार्ड यांना मिळाला होता.
सोलापूर : महामानव, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापूर दौऱ्यावर असताना शहरातील फॉरेस्ट येथील गंगा निवास येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्काम केला. तसेच सकाळी बाबासाहेबांनी गंगा निवासमध्ये नाश्ता केला होता, ज्या ताटात बाबासाहेबांनी नाश्ता केला होता ते ताट, ग्लास, कप आणि वाटी तसेच इतर साहित्य पसलेलू परिवाराने मोठ्या अभिमानाने जपून ठेवले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 14 जानेवारी 1946 रोजी मद्रास मेलने सोलापुरात एका कामानिमित्त आले असताना त्यांचे आदरातिथ्य करण्याचा मान हणमंतु सायण्णा गार्ड यांना मिळाला होता. बाबासाहेबांचे राहण्याची सोय हणमंतु सायण्णा यांच्या घरी करण्यात आली होती. बाबासाहेबांना गंगा निवासस्थानपर्यंत आणण्यासाठी हिलमन कंपनीची कार हणमंतु गार्ड यांनी आणली होती. याच कारमध्ये बसून बाबासाहेब आंबेडकर फॉरेस्ट मधील गंगा निवास येथे आले होते. त्या काळात गंगा निवाससारखे चांगले घर आसपासही नव्हते, असे प्रकाश पसलेलू यांनी सांगितले.
advertisement
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सोलापुरातील गंगा निवासमध्ये वापरलेले ताट, तांब्या, डायनिंग टेबल, फुलपात्र, चमचा इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. हे वस्तू आजही गंगा निवासात जपून ठेवण्यात आले असून बाबासाहेबांनी या गंगा निवासात वास्तव्य केल्याचा अभिमान आजही गार्ड कुटुंबीयांना आहे. सध्या या गंगा निवासमध्ये हणमंतु गार्ड यांचे नातू प्रकाश पसलेलू आपल्या कुटुंबीयांसोबत राहण्यास आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने लाभलेल्या या ऐतिहासिक दृष्ट्या या घराचे विशेष महत्त्व आंबेडकरी चळवळीला साक्षीदार म्हणून याकडे पाहता येईल.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
December 06, 2025 2:55 PM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
‘…म्हणून बाबासाहेबांच्या वस्तू मोठ्या अभिमानाने जपून ठेवल्या’, सोलापूरच्या गार्ड कुटुंबाची मनाला स्पर्श करणारी कहाणी

