आठवणीना उजाळा! रेल्वे रोखून बाबासाहेबांच्या हस्ते करून घेतलं होतं वास्तूच उद्घाटन, सोलापुरातील हे ठिकाण माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
शंकरराव रिकिबे यांनी बांधलेल्या वास्तूचे उद्घाटन डॉ. बाबासाहेबांच्या हस्ते व्हावे, यासाठी शंकरराव रिकिबे यांनी रेल्वे थांबवून त्या वास्तूचे उद्घाटन बाबासाहेबांच्या हस्ते करून घेतले.
सोलापूर : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सोलापूर जिल्ह्यात अनेक वेळा आगमन झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डूवाडी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोसरे गावाला देखील पदस्पर्श झाला आहे. शंकरराव रिकिबे यांनी बांधलेल्या वास्तूचे उद्घाटन डॉ. बाबासाहेबांच्या हस्ते व्हावे, यासाठी शंकरराव रिकिबे यांनी रेल्वे थांबवून त्या वास्तूचे उद्घाटन बाबासाहेबांच्या हस्ते करून घेतले. कुर्डुवाडी गावात राहणारे अर्जुन साधू गाडे यांनी बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
कुर्डूवाडी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर भोसरे या गावात राहणारे शंकरराव रिकिबे त्या काळात एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यक्ती होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शंकरराव यांचे घनिष्ठ संबंध होते. ज्या-ज्या वेळेस बाबासाहेब या भागात सभा, मिटिंग घेत होते, त्याचे नियोजन, व्यवस्था शंकरराव रिकिबे करत होते. बाबासाहेब या ठिकाणी आल्यावर आवर्जून शंकरराव रिकिबे यांना बोलावून घेत असत.
advertisement
शंकरराव रिकिबे यांचे शेत भोसरे गावा लगत असून या शेतामध्ये दोन मजली इमारत बांधावी आणि एक विहीर बांधावी अशी इच्छा शंकररावांनी बाबासाहेबांसमोर व्यक्त केली. शंकरराव रिकिबे यांनी बाबासाहेबांसमोर सांगितलेली इच्छा खरी करून दाखवली आणि दोन मजली इमारत आणि विहीर बांधली. शंकररावांनी बांधलेल्या या दोन्ही वास्तूंच्या उद्घाटनासाठी बाबासाहेबांना निरोप दिला.
advertisement
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. शंकरराव यांनी बांधलेले घर आणि विहीर ही रेल्वे मार्गांपासून 50 मीटर अंतरावर होती. ज्यावेळेस रेल्वे या ठिकाणी आली, तेव्हा शंकररावांनी अनधिकृतपणे रेल्वेगाडी थांबवून बाबासाहेबांना रेल्वेतून खाली उतरवून घेतले आणि बांधलेल्या वास्तूचे 1937 साली उद्घाटन करून घेतले. रेल्वे गाडी अनधिकृतपणे थांबवून घेतल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्याने त्यांच्यावर दंड ठोठावला, अधिकाऱ्याने ठोठावलेला दंड शंकररावांनी जमा देखील केला. पंढरपुरात सुद्धा शंकरराव रिकिबे यांचा रिकिबे वाडा सुद्धा आहे आणि या वाड्याचे सुद्धा उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करून घेतले होते.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
December 05, 2025 5:44 PM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
आठवणीना उजाळा! रेल्वे रोखून बाबासाहेबांच्या हस्ते करून घेतलं होतं वास्तूच उद्घाटन, सोलापुरातील हे ठिकाण माहितीये का?

