Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचं धार्मिक महत्त्व; व्रत-उपवास करणाऱ्यांना काय मिळतं?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
श्रीगणेश हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे. तो दु:खहर्ता, सुखकर्ता आहे. म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाचे पूजन करून अथर्वशीर्षाचा पाठ करावा. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन घेऊन यथाशक्ती गरीब-गरजूना दान करावे, विधीपूर्वक उपवास सोडल्यानंतर याच जन्मी समाधानाचे पुण्य प्राप्त करून घेता येते. मनोबल वाढण्यास मदत होते. आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो. जीवन आनंदी, सुखी व समाधानी होण्यास मदत होते. संकष्टी चतुर्थी उपवासाचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


