दीक्षाभूमी, चैत्यभूमी आणि 'ही' प्रेरणाभूमी, बाबासाहेबांशी थेट कनेक्शन, तुम्हाला माहितीये का लोकेशन?

Last Updated:

Dr Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित नागपूरची दीक्षाभूमी आणि मुंबईची चैत्यभूमी महत्त्वाची मानली जाते. तसेच महाराष्ट्रातील प्रेरणाभूमी असणारं हे ठिकाण देखील महत्त्वाचं आहे.

+
Dr

Dr babasaheb ambedkar: दीक्षाभूमी, चैत्यभूमी आणि ही प्रेरणाभूमी, बाबासाहेबांशी थेट कनेक्शन, तुम्हाला माहितीये का लोकेशन?

सोलापूर - महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 साली मुंबई येथे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर त्यांच्या अस्थी कलशांचे महाराष्ट्रातील तीनच ठिकाणी दर्शन होते, मुंबई येथील चैत्यभूमी, नागपूर येथील दीक्षाभूमी यानंतर सोलापूर शहरातील प्रेरणाभूमी आहे. ही प्रेरणाभूमी आजही आंबेडकर अनुयायींना प्रेरणा देण्याचं काम करत आहे. या संदर्भात अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते आतिश बनसोडे यांनी दिली.
मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. सोलापुरातील पांजरापोळ चौकामध्ये असलेल्या सी नरसी ट्रान्सपोर्टमध्ये निरोप आला. केरू जाधव, तुकाराम (बुवा) इंगळे, रामचंद्र जाधव, अण्णासाहेब कदम, भीमराव सरवदे, लक्ष्मण अबुटे, एन. एस. कांबळे, दराप्पा कांबळे, मेसा सिद्धगणेश, शिंदे गुरुजी, रामचंद्र रणशृंगारे आदी कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आणि 7 डिसेंबर रोजी बाबासाहेबांना अखेरचा निरोप देण्यात आला.
advertisement
सोलापूर शहरातील आंबेडकर अनुयायी तुकाराम (बुवा) इंगळे हे चार दिवस मुंबईत राहिले आणि त्यांनी सोलापुरात बाबासाहेबांच्या अस्थिंचा कलश आणण्याचा निर्णय घेतला. पाच दिवसांनी म्हणजेच 11 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी सकाळी 8 वाजता मद्रास मेलने सोलापुरात आणण्यात आल्या. तेव्हा मोठ्या संख्येने अनुयायी या ठिकाणी जमले होते.
advertisement
सोलापुरातील हेच ठिकाण प्रेरणाभूमी म्हणून ओळखले जाते. 1956 पासून आजतागायत दरवर्षी भीमसैनिकांचा मोठा जनसागर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सोलापूर शहरातील थोरला राजवाडा येथे दाखल होतो.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
दीक्षाभूमी, चैत्यभूमी आणि 'ही' प्रेरणाभूमी, बाबासाहेबांशी थेट कनेक्शन, तुम्हाला माहितीये का लोकेशन?
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement