What is Flight Duty Time Limit : काय आहे फ्लाइट ड्यूटी टाईम लिमिट? ज्यामुळे Indigo वाल्यांची झाली अशी अवस्था?

Last Updated:

प्रश्न असा उद्भवतो की, हे अचानक हे झालं कसं? काय विमानांचे इंजिन खराब झाले होते? की हवामान खराब होतं? तर याचं उत्तर आहे 'नाही'. या गोंधळामागे मुख्य कारण आहे एक सरकारी नियम, ज्याचे नाव आहे FDTL (Flight Duty Time Limit).

इंडिगो फ्लाइट्स इशू
इंडिगो फ्लाइट्स इशू
मुंबई : तुम्ही प्रवासाला निघालायत, मनात आनंद आहे, सुट्टीच्या आणि रिलॅक्सच्या विचाराने मन हलकं झालंय, बॅगा भरल्या आहेत, टॅक्सी वेळेवर आली आहे आणि मनात सुट्टीचा विचार आहे किंवा महत्त्वाच्या मिटिंगसाठी फ्लाइटने कुठे चालला आहेत. सगळं एकदम मनासारखं झालंय आणि अचानक एअरपोर्टवर पोहोचताच तुम्हाला समजतं की तुमची फ्लाईट रद्द झाली आहे आणि नुसती तुमचीच नाही, तर आजूबाजूच्या शेकडो लोकांची हीच अवस्था आहे. विचार करा, त्या क्षणी काय मनस्ताप होईल?
नेमकी हीच परिस्थिती गेल्या काही दिवसांत देशातील हजारो प्रवाशांवर ओढवली. भारताची सर्वात मोठी एअरलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या IndiGo च्या प्रवाशांनी असे हाल कदाचित पहिल्यांदाच अनुभवले असतील. दिल्ली, मुंबई, बंगळुरू असो की हैदराबाद, देशातील प्रत्येक मोठ्या एअरपोर्टवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा आणि चेहऱ्यावर संताप दिसत होता. एका दिवसात तब्बल 550 हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द होणे किंवा रखडणे, हा इंडिगोच्या इतिहासातील सर्वात मोठा 'फ्लॉप शो' मानला जात आहे.
advertisement
पण प्रश्न असा उद्भवतो की, हे अचानक हे झालं कसं? काय विमानांचे इंजिन खराब झाले होते? की हवामान खराब होतं? तर याचं उत्तर आहे 'नाही'. या गोंधळामागे मुख्य कारण आहे एक सरकारी नियम, ज्याचे नाव आहे FDTL (Flight Duty Time Limit).
चला तर मग समजून घेऊया, नक्की काय आहे FDTL हा नियम आणि यामुळे इंडिगोचे गणित कसे बिघडले?
advertisement
FDTL (Flight Duty Time Limit) म्हणजे नक्की काय?
सोप्या भाषेत सांगायचे तर, जसे आपण ऑफिसमध्ये 8-9 तास काम केल्यानंतर थकतो आणि आपल्याला आरामाची गरज असते, तसाच नियम वैमानिकांसाठी (Pilots) आणि केबिन क्रूसाठी लागू होतो.
Flight Duty Time Limit (FDTL) हा असा नियम आहे जो ठरवतो की एक पायलट सलग किती तास विमान उडवू शकतो. त्याला दोन ड्युटीच्या मध्ये किती तासांची विश्रांती (Rest) मिळणे अनिवार्य आहे. एका रात्रीत किती लँडिंग करता येऊ शकतात वैगरे वैगरे...
advertisement
हे नियम प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण, आकाशात हजारो फूट उंचावर विमान उडवताना वैमानिकाला थकवा येणे किंवा झोप येणे हे शेकडो प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे या गोष्टींला महत्व देणं गरजेचं होतं, त्यासाठी सरकारने त्याच्यावर नियम देखील लावले.
नव्या नियमांनी काय बदलले?
सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी या नियमांमध्ये (FDTL) नोव्हेंबर महिन्यापासून काही मोठे बदल लागू करण्यात आले, ज्यामुळे इंडिगोचे गणित कोलमडले.
advertisement
पूर्वी वैमानिकांना आठवड्याला 36 तासांचा आराम मिळणे बंधनकारक होते, ते आता वाढवून 48 तास करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी विमान लँड करण्यावर निर्बंध आले आहेत. पूर्वी रात्री 6 लँडिंग करता येत होत्या, आता त्या फक्त 2 करण्यात आल्या आहेत.
सर्वात मोठा फटका IndiGo लाच का?
इतर एअरलाईन्सच्या तुलनेत इंडिगोवर याचा सर्वात जास्त परिणाम झाला, ज्याची काही प्रमुख कारणे आहेत. एकतर टाईट शेड्यूलिंग इंडिगो 400 हून अधिक विमानांसह दिवसाला 2,300 पेक्षा जास्त फ्लाईट्स ऑपरेट करते. त्यांचे बिझनेस मॉडेल असे आहे की, कमीत कमी कर्मचाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त उड्डाणे करणे.
advertisement
इंडिगो रात्रीच्या वेळी सर्वाधिक विमाने उडवते. नव्या नियमांमुळे रात्रीच्या लँडिंगवर मर्यादा आल्याने त्यांच्या अनेक फ्लाईट्स रद्द कराव्या लागल्या. नवीन नियमांनुसार वैमानिकांना जास्त सुट्ट्या द्याव्या लागल्या, पण त्या बदल्यात कामावर घेण्यासाठी इंडिगोकडे पुरेसे अतिरिक्त पायलट (Backup Crew) उपलब्ध नव्हते.
थोडक्यात, एका साखळीसारखे हे संकट वाढत गेले. एका फ्लाईटला उशीर झाला की, त्या क्रूची ड्युटी संपायची वेळ जवळ यायची आणि पुढची फ्लाईट रद्द करावी लागायची.
advertisement
या गोंधळामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने प्रवाशांसाठी एक अ‍ॅडव्हायजरी (Advisory) जारी केली आहे. एअरपोर्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ऑपरेशनल कारणांमुळे उड्डाणांना विलंब होत आहे. त्यामुळे प्रवाशांनी एअरपोर्टवर येण्यापूर्वी आपल्या एअरलाईनकडून फ्लाईट स्टेटस तपासून मगच घरातून निघावे.
विमान प्रवास हा वेळेची बचत करण्यासाठी असतो, पण जेव्हा एअरलाईनचे नियोजन कोलमडते, तेव्हा प्रवाशांचे हाल होतात. FDTL चे नियम प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीच आहेत हे जरी खरे असले, तरी एअरलाईन्सनी त्यानुसार आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे आणि नियोजन करणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रवाशांना असा मनस्ताप सहन करावा लागणार नाही.
view comments
मराठी बातम्या/देश/
What is Flight Duty Time Limit : काय आहे फ्लाइट ड्यूटी टाईम लिमिट? ज्यामुळे Indigo वाल्यांची झाली अशी अवस्था?
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement