Crime News : तो विसरला नव्हता..! रस्त्यात घडलं भयंकर कृत्य; उल्हासनगरमधील घटना
Last Updated:
Ulhasnagar Crime News : उल्हासनगर कॅम्प 4 मध्ये जुन्या वादातून रणजीत गायकवाड यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना मध्यवर्ती आणि नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील संभाजी चौक परिसरात गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास जुन्या वादातून रणजीत गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. रणजीत गायकवाड आपल्या कामानिमित्त जात असताना आधीपासून तगा धरुन असलेल्या व्यक्तीने अचानक त्यांच्यावर तुटून पडत लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. या घटनेनं परिसरात काही क्षण दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
पीडीत गंभीर जखमी
अचानक झालेल्या या हल्ल्याने गायकवाड गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तत्काळ मदत करुन त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार डोक्यासह शरीरावर गंभीर जखमा असून काही तास परिस्थिती चिंताजनक होती.
advertisement
जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला
घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशीदरम्यान हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचे स्पष्ट झाले. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. या धक्कादायक घटनामुळे कॅम्प 4 परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांनी पोलिसांकडे सुरक्षिततेची मागणी केली असून जुन्या रागातून होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढताना दिसत असल्याने नागरिकांनी पोलिसांना गस्त वाढवण्याचे आवाहन केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2025 3:10 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Crime News : तो विसरला नव्हता..! रस्त्यात घडलं भयंकर कृत्य; उल्हासनगरमधील घटना


