Agricultre News : आर्थिक गणित बिघडणार, शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, खतांच्या दरात मोठी वाढ, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांची दरवाढ थांबायचे नाव घेत नाहीत. यंदाच्या हंगामातही 50 किलोच्या गोणीवर तब्बल 200 ते 250 रुपयांची वाढ झाली.
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांची दरवाढ थांबायचे नाव घेत नाहीत. यंदाच्या हंगामातही 50 किलोच्या गोणीवर तब्बल 200 ते 250 रुपयांची वाढ झाली. एकीकडे पावसाचे लहरीपण, नैसर्गिक संकटं, तर दुसरीकडे पिकांना हमीभाव नाही. त्यात खतांचे असे वाढते दर पाहून शेतकऱ्यांचा खर्च तर फुगतोयच, पण संपूर्ण हिशोबच गोंधळून गेलाय. शेतीला खतं लागतात हे खरं, पण सरकारकडून दरवर्षी वाढत चाललेल्या या भाववाढीमुळे उत्पादन खर्च आणि हातात येणाऱ्या उत्पन्नाचे चक्रच बिघडून बसलं आहे. त्यामुळे शासनाने खत औषधांवरील भाववाढ स्थगित करावी तसेच कापसाला योग्य हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी उद्धव मुळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना केली.
शेतीमध्ये योग्य उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर अपरिहार्य मानला जातो. मात्र गेल्या काही हंगामांपासून खतांच्या भाववाढीचा ताण शेतकऱ्यांच्या माथी येतच आहे. दरवर्षी थोडीफार नव्हे तर सरळ 50 किलोच्या गोणीमागे 200 ते 250 रुपयांची वाढ होत असल्याने उत्पादनाचा मूलभूत खर्चच बोजदार झाला आहे. हंगाम जवळ आल्याने खतांसाठी दुकाने गाठणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव दराचा धक्का बसत असून, खर्च आणि मिळकत यातील ताळमेळच बिघडताना दिसत आहे.
advertisement
एका बाजूला शेतमालाला योग्य भाव मिळत नाही तर दुसऱ्या बाजूला खते आणि कीटकनाशकांचे दर दरवर्षी चढतेच आहेत. उन्हाळी कांदा आणि इतर पिकांसाठी निश्चित प्रमाणात रासायनिक खत देणे गरजेचे असते, त्यामुळे खर्च टाळण्याचा प्रश्नच नाही. वाढलेल्या दरामुळे शेतकरी नाईलाजाने खरेदी करत असले तरी या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे कृषी क्षेत्रातून सांगितले जात आहे. खतांच्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, तसेच कापसाला हमीभाव, द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
December 06, 2025 5:02 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Agricultre News : आर्थिक गणित बिघडणार, शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, खतांच्या दरात मोठी वाढ, Video

