शेतीमध्ये योग्य उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर अपरिहार्य मानला जातो. मात्र गेल्या काही हंगामांपासून खतांच्या भाववाढीचा ताण शेतकऱ्यांच्या माथी येतच आहे. दरवर्षी थोडीफार नव्हे तर सरळ 50 किलोच्या गोणीमागे 200 ते 250 रुपयांची वाढ होत असल्याने उत्पादनाचा मूलभूत खर्चच बोजदार झाला आहे. हंगाम जवळ आल्याने खतांसाठी दुकाने गाठणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव दराचा धक्का बसत असून, खर्च आणि मिळकत यातील ताळमेळच बिघडताना दिसत आहे.
advertisement
Mumbai News: मुंबईमध्ये 'रॅपिडो' बंद होणार? गुन्हा दाखल, आरटीओने केली कारवाई; नेमकं कारण काय?
एका बाजूला शेतमालाला योग्य भाव मिळत नाही तर दुसऱ्या बाजूला खते आणि कीटकनाशकांचे दर दरवर्षी चढतेच आहेत. उन्हाळी कांदा आणि इतर पिकांसाठी निश्चित प्रमाणात रासायनिक खत देणे गरजेचे असते, त्यामुळे खर्च टाळण्याचा प्रश्नच नाही. वाढलेल्या दरामुळे शेतकरी नाईलाजाने खरेदी करत असले तरी या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे कृषी क्षेत्रातून सांगितले जात आहे. खतांच्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, तसेच कापसाला हमीभाव, द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे.





