TRENDING:

Pune News: इथे प्राणी नाही तर माणसं राहतात पिंजऱ्यात, पुण्यातील लोकांवर ही वेळ का आली?

Last Updated:
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात तर बिबट्याची मोठी दहशत असलेली पाहायला मिळत असून या भागात बिबट्याचा वावर एवढा वाढलाय की लोकांनी घाबरून आता आपल्या घराभोवती पिंजरा उभारला आहे.
advertisement
1/8
इथे प्राणी नाही तर माणसं राहतात पिंजऱ्यात, पुण्यातील लोकांवर ही वेळ का आली?
उत्तर पुणे जिल्हा हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनला असून त्याच्या दहशतीन ग्रामस्थ भयभीत झाल्याचं चित्र आहे. आता या बिबट्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थ वाटेल त्या उपाययोजना करत आहेत.
advertisement
2/8
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावच्या महिलांनी तर थेट गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेला पट्टाच घातलाय. शेतात राबताना बिबट्याने आपली शिकार करु नये, म्हणून महिलांनी टोकदार खिळे असलेला पट्टा गळ्यात घातल्याचं चित्र आहे.
advertisement
3/8
तर दुसरीकडे घराच्या आसपास देखील बिबट्या घुटमळताना दिसतो. त्यामुळे घरात देखील सुरक्षीत राहण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे.
advertisement
4/8
पूर्वी प्राणी पिंजऱ्यात राहत होते आणि माणसं मोकळी वावरत होती. पण उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत वाढली आणि आता ठिकठिकाणी माणसानेच आपल्या घराभोवती तार जाळ्यांचा मोठा पिंजरा करून घेतलेला पाहायला मिळत आहे.
advertisement
5/8
उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याची मोठी दहशत असून बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 56 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
advertisement
6/8
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात तर बिबट्याची मोठी दहशत असलेली पाहायला मिळत असुन या भागात बिबट्याचा वावर एवढा वाढलाय की लोकांनी घाबरून आता आपल्या घराभोवती पिंजरा उभारला आहे.
advertisement
7/8
उंचच उंच जाळ्यांचे तार कंपाऊंड करून घेण्यास सुरुवात केली आहे. या दहशतीमुळे महाराष्ट्रात लोकांना स्वतःच्या संरक्षणासाठी असे कठीण उपाय करावे लागत आहेत.
advertisement
8/8
शेती हेचं उपजीविकेचं साधन असल्यानं, शेतात जाण्याविना या शेतकऱ्यांसमोर पर्याय नसतो. पण त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यातून जीव कसा वाचवायचा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune News: इथे प्राणी नाही तर माणसं राहतात पिंजऱ्यात, पुण्यातील लोकांवर ही वेळ का आली?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल