TRENDING:

Pune Grand Tour 2026: पुणेरी रस्ता गुळगुळीत, 70 किमी स्पीड अन् एक चूक, सायकल टूरमध्ये विचित्र अपघात, PHOTOS

Last Updated:
Pune Grand Tour 2026: आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर स्पर्धेदरम्यान एकामागोमाग एक सायकलपटू एकमेकांवर आदळले आणि मोठा गोंधळ उडाला.
advertisement
1/7
पुणेरी रस्ता गुळगुळीत, 70 किमी स्पीड अन् एक चूक, सायकल टूरमध्ये विचित्र अपघात, P
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर स्पर्धेदरम्यान मुळशी तालुक्यातील कोळवण रोडवर मोठा अपघात घडला. तिकोना किल्ल्याजवळील या मार्गावर रस्त्याची रुंदी अचानक कमी झाल्याने सायकलपटूंना परिस्थितीचा अंदाज आला नाही आणि वेगात असणारे 70 हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले. या अपघातात अनेक खेळाडू जखमी झाले असून काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
2/7
मिळालेल्या माहितीनुसार, मुळशी-कोळवण रस्त्यावरून सायकलपटू पुढे जात असताना अचानक अरुंद रस्ता आणि तीव्र वळण सुरू झाले. स्पर्धेदरम्यान सायकलपटू ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगात होते.
advertisement
3/7
वेगात असतानाच आघाडीवरील एका सायकलपटूचा ताबा सुटल्याने तो घसरला आणि मागून येणाऱ्या खेळाडूंना थांबण्यास वेळ मिळाला नाही. परिणामी एकामागोमाग एक सायकलपटू एकमेकांवर आदळले आणि मोठा गोंधळ उडाला.
advertisement
4/7
अपघातानंतर स्पर्धास्थळी असलेल्या वैद्यकीय पथकाने तातडीने मदतकार्य सुरू केले. किरकोळ जखमी झालेल्या काही सायकलपटूंना प्राथमिक उपचार देण्यात आले, तर गंभीर जखमी खेळाडूंना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिलासादायक बाब म्हणजे, काही सायकलपटूंनी किरकोळ अपघातानंतर पुन्हा स्पर्धेत सहभाग घेतला.
advertisement
5/7
या घटनेनंतर स्पर्धेच्या आयोजनावर आणि जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेसाठी मार्गाची योग्य पाहणी, धोकादायक ठिकाणी पूर्वसूचना फलक, वेग नियंत्रण आणि सुरक्षा उपाययोजना आवश्यक असतात.
advertisement
6/7
पुण्यात मात्र, अरुंद रस्ता, तीव्र वळण आणि पुरेशी सूचना नसल्याने अपघात घडल्याचा आरोप स्पर्धकांकडून आणि उपस्थित नागरिकांकडून केला जात आहे.
advertisement
7/7
दरम्यान, आयोजकांनी अपघाताची दखल घेत पुढील टप्प्यांसाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाकडूनही या घटनेची चौकशी करून आवश्यक सुधारणा करण्याची मागणी होत आहे. ‘पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर’सारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Grand Tour 2026: पुणेरी रस्ता गुळगुळीत, 70 किमी स्पीड अन् एक चूक, सायकल टूरमध्ये विचित्र अपघात, PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल