TRENDING:

ना बुधवार पेठ, ना कसबा पेठ; पुण्याच्या मेट्रो स्टेशनला राष्ट्रवादीने सुचवलं तिसरंच नाव

Last Updated:
पुण्यातील मेट्रो स्टेशनच्या नावावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. शिवसैनिकांनंतर आता राष्ट्रवादीनंही नावाचा वेगळा पर्याय दिला आहे.
advertisement
1/6
ना बुधवार पेठ, ना कसबा पेठ; पुणे मेट्रो स्टेशनला राष्ट्रवादीने सुचवलं तिसरंच नाव
पुण्याची मेट्रो काही ना काही कारणामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता चर्चेत आली आहे ती एका स्टेशनच्या नावावरून.
advertisement
2/6
पुणे मेट्रो प्रशासनाकडून कसबा पेठेत होऊ घातलेल्या स्टेशनला बुधवार पेठ असं नाव देण्यात आलं. पण याला विरोध झाला.
advertisement
3/6
यानंतर शिवसैनिकांनी बुधवार पेठ स्थानक नावाचा बोर्ड तोडला. हा बोर्ड तोडून शिवसैनिकांनी तिथे कसबा पेठ स्थानक असा बोर्ड लावला.
advertisement
4/6
याआधीही शिवसेनेकडून नाव बदलून कसबा पेठ स्थानक नाव द्या अशी मागणी करण्यात आली होती. ठाकरे गटाचे कसबा मतदारसंघाचे विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण यांनी मेट्रो प्रशासनाला दोन वर्षा पूर्वी नाव बदलणे संदर्भात पत्र दिले असूनही स्टेशनला बुधवार पेठ स्टेशन असा बोर्ड लावण्यात आला होता.
advertisement
5/6
दरम्यान आता या वादात पुणे शहर माजी महापौर संघटनेनंही उडी घेतली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अंकुश काकडे यांनी या स्टेशनला शनिवारवाडा असं नाव देण्याची मागणी केली आहे.
advertisement
6/6
प्रत्येक पेठेचं आपलं वेगळं महत्त्व आहे. पेठांच्या नावावरून वाद घालणं निरर्थक आहे. एखाद्या ठिकाणी एखादी चुकीची घटना होत असेल म्हणून ती संपूर्ण पेठ बदनाम कशी होऊ शकते? म्हणूनच बुधवार की कसबा हा वाद टाळण्यासाठी शनिवारवाडा असं नाव द्यावं, असं ते म्हणाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
ना बुधवार पेठ, ना कसबा पेठ; पुण्याच्या मेट्रो स्टेशनला राष्ट्रवादीने सुचवलं तिसरंच नाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल